अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येसाठी आलेले हल्लेखोर हे लाल रंगाच्या दुचाकीवर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार अकोट पोलिसांनी लालरंगाच्या दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या वाहनांची तपासणी केली. तपासा अंती पोलिसांनी या दुचाकी सोडून दिल्या.
तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहर पोलीस निवसाजवळ गोळीबार झाला होता. या घटनेनंतर उपचारादरम्यान पुंडकर यांचा मृत्यू झाला होता. तपासात हल्लेखोर हे लाल रंगाच्या दुचाकीवर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अकोट पोलिसांनी लाल रंगाच्या वेगाने धावणाऱ्या दुचाकी तपासल्या. कारवाईदरम्यान पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेऊन चालकांची चौकशी केली आणि दुचाकींची कागदपत्रे तपासली. जी वाहने संशयित वाटली त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, चौकशीत काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांकडून ठिकठिकाणी चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा- महाविकास आघाडीविरोधात भाजपचे आंदोलन; अनेक पदाधिकारी सहभागी