अकोला : पातुर बाळापूर मार्गावर येत असलेल्या बाभुळगावजवळ आज दुपारी पोलिसांच्या कारचा टायर फुटल्याने (police car tire burst ) वाहन पलटी (vehicle overturned) झाले. यात चार पोलीस कर्मचारी व तीन होमगार्ड असे एकूण सात जखमी (Seven people injured in Police Car accident) झाल्याची घटना घडली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा बंदोबस्त आटोपून पातुरकडे जात असताना हा अपघात घडला. Police Car Accident Akola, Akola Crime, latest news from Akola
सलग दोन दिवसांपासून पोलीस कर्त्यव्यावर- सलग दोन दिवसांपासून जिल्ह्याचे पोलीस 24 तास राहुल गांधी यांच्या भारत जोडी यात्रेच्या बंदोबस्तात व्यस्त होते. ही यात्रा पातुर वाडेगाव बाळापूर मार्गे शेगाव रवाना झाली. सलग दोन दिवस जिल्ह्याची पोलीस यंत्रणा व होमगार्ड बंदोबस्तात व्यस्त असल्याने ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दाखल झाली. अकोला पोलिसांचा ताण कमी झाला.
टायर फुटला आणि गाडी पलटली- बंदोबस्त आटपून सर्व पोलीस कर्मचारी आपआपल्या पोलीस स्टेशन येथे रवाना होत असताना पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. पोलिस मुख्यालयाचे मोटरचे वाहन एमएस -30-एच-506 या क्रमांकाच्या गाडीने पातुरकडे जात असताना गाडीचे टायर फुटले. गाडीचे चाकाला होमगार्ड संजय शिरसाट यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली.
गाडीच्या तीन पलट्या - या अपघातात पोलीस कर्मचारी सुनील सुखदेव वाघ, अश्वजीत सदार, उमेश सानप, कुंदन इंगळे, तसेच होमगार्ड गजानन घेघाटे, मोहम्मद यासिर व होमगार्ड वाहन चालक संजय शिरसाट हे जखमी झाले. अपघात एवढा भयंकर होता की, या गाडीने तीन पलट्या खाऊन गाडी रस्त्याच्या कडेला पडली. सुदैवाने यात कोणतीच जीवीतहानी झाली नसून जखमीवर बाभूळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.