ETV Bharat / state

पोलिसाच्या घरात चोरी;  चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला - famaly

चांदीच्या दागिन्यांकडे त्यांनी पाहीले ही नसल्याचे दिसते. चांदीचे दागिने तसेच पडलेले होते. ही चोरी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची झाल्याचे दिसते. खदान पोलीस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्यावर डल्ला
author img

By

Published : May 4, 2019, 2:52 PM IST

अकोला - बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्या घरातच शुक्रवारी भरदिवसा चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये १८० ग्रॅम सोने आणि २० हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना जुने खेतन नगरात घडली. या घटनेमुळे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या घरीच चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. तसेच नागरिकांना मौल्यवान वस्तू घरी न ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिसासाठी हा नियम लागू नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंकज भाऊराव पवार यांच्याकडे ही चोरी झाली.

चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्यावर डल्ला

पंकज पवार हे अमरावती येथे सहकुटुंब शुक्रवारी दुपारी गेले होते. रात्री ते परत आले असता त्यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून घरातील कपाटांमधून १८० ग्रॅम सोने आणि २० हजार रुपयांची रोख चोरट्यांनी चोरून नेली. ते घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी खदान पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही चोरी दुपारी झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिने चोरले. चांदीच्या दागिन्यांकडे त्यांनी पाहीले ही नसल्याचे दिसते. चांदीचे दागिने तसेच पडलेले होते. ही चोरी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची झाल्याचे दिसते. खदान पोलीस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंकज पवार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. या चोरीने चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. या घटनेने खदान पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेंच जे पोलीस नागरिकांना चोरीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची शिकवण देतात, त्यांच्याकडेच हा प्रकार घडल्याने आता पोलिसांना पण हेच शिकविण्याची गरज असल्याचे दिसून येते.

Intro:अकोला - बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्या घरात शुक्रवारी भरदिवसा चोरट्यांनी 180 ग्रॅम सोने आणि 20 हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना जुने खेतन नगरात घडली. या घटनेमुळे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून पोलिसांच्या घरीच चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तसेच नागरिकांना मौल्यवान वस्तू घरी न ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिसासाठी हा नियम लागू नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंकज भाऊराव पवार यांच्याकडे ही चोरी झाली.Body:पंकज पवार हे अमरावती येथे सहकुटुंब शुक्रवारी दुपारी गेली होती रात्री ते परत आले असता त्यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून आतमध्ये प्रवेश घरातील कपाटांमध्ये 180 ग्रॅम सोने आणि वीस हजार रुपयांची रोख चोरट्यांनी चोरून नेली. ते घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी खदान पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही चोरी दुपारी झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांना हात लावला. चांदीच्या दागिन्यांकडे त्यांनी पाहीले ही नसल्याचे दिसते. चांदीचे दागिने तसेच पडलेले होते. ही चोरी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची झाल्याचे दिसते. खदान पोलिस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंकज पवार हे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडील चोरीने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेने खदान पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेंच जे पोलिस नागरिकांना चोरीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची शिकवण देतात, त्यांच्याच कडे हा प्रकार झाल्याने आता पोलिसांना पण हेच शिकविण्याची गरज असल्याचे दिसून येते.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.