ETV Bharat / state

महापालिका हद्दीत कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी; तीन जूनपर्यंत मोहीम राबविणार

पावसाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणीत आढळणारे कोविडबाधित, अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त यांची स्वतंत्र यादी केली जाईल. त्या-त्या भागातील दवाखान्यांत भरती रुग्णांची माहिती घेण्यासह फळविक्रेते, भाजी विक्रेते, दूध वितरक यांची प्राधान्याने तपासणी होईल.

COVID-19
अकोला न्यूज
author img

By

Published : May 28, 2020, 9:42 AM IST

अकोला - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम गुरुवार (ता. 28) ते बुधवार (3 जून) या एका आठवड्याच्या कालावधीत महापालिका हद्दीत राबविली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भविष्यात पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आजारांचा अधिक फैलाव होण्याआधी ही तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्रासहित सर्व क्षेत्रात युद्धपातळीवर ‘कुटुंबनिहाय सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या तपासणीत प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्राला लागून असलेले क्षेत्र, या व्यतिरिक्त मनपा हद्दीतील क्षेत्र या सर्व ठिकाणी मनपामार्फत नियुक्त आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी नागरिकांची तपासणी करतील. यासाठी शहराचे चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण) तयार केले आहेत.

तपासणीचे दैनंदिन अहवाल एकत्र संकलित करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले जातील. या तपासणीत आढळणारे कोविडबाधित, अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्ती यांची स्वतंत्र यादी करण्यात येईल. त्या-त्या भागातील दवाखान्यांना भेटी देऊन दवाखान्यात भरती रुग्णांची माहिती घेणे, फळविक्रेते, भाजी विक्रेते, दूध वितरक यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येईल.

मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. तर, मनपा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असून अन्य सदस्यांत उपविभागीय अधिकारी अकोला व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.