ETV Bharat / state

निर्भया खरंच निर्भय झाली आहे का? मोर्चात महिलांचा आर्त टाहो - अकोला मोर्चा न्यूज

देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील निर्भया त्यानंतर हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानतंर घटनांना आवर घालणे गरजेचे असून या देशामध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत शनिवारी शहरात युवतींनी मोर्चा काढला.

womens-march-in-akola
निर्भया खरंच निर्भय झाली आहे का? मोर्चात महिलांचा आर्त टाहो
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:12 PM IST

अकोला - देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील निर्भया त्यानंतर हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानतंर घटनांना आवर घालणे गरजेचे असून या देशामध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत शनिवारी शहरात युवतींनी मोर्चा काढला.

हेही वाचा - चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

शहारातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने निघालेला हा मोर्चा अशोक वाटिका येथून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या परिसरात आल्यानंतर हैदराबादमधील प्रकरणातील महिला पशुवैद्यकीय पीडितेला श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले.

निर्भया खरंच निर्भय झाली आहे का? मोर्चात महिलांचा आर्त टाहो

वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सक्षम प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी युवतींच्या वतीने करण्यात आली. तक्रार नोंदण्यासाठी क्षेत्राची सीमा नसावी, झिरो एफआयआर प्रणाली देशभरातील पोलीस यंत्रणेने राबवावी, आरोपींना अटक करणे व तपासामध्ये विलंब होणार नाही, अशी व्यवस्था असावी, अत्याचाराची सर्व प्रकरणे जलदगतीने चालविण्यात यावी, निकालासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू नये, अत्याचार प्रकरणातील आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असू नये, यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Intro:अकोला - देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे दिल्लीतील निर्भया त्यानंतर हैदराबाद येथील डॉक्टर रेड्डी अत्याचार प्रकरणाने तर देशाची मानच खाली गेली आहे या घटनांना आवर घालण्यात गरजेचे असून या देशांमध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित करून अकोल्यातील युती महिलांनी मोर्चा काढत निर्भया खर्च निर्भय झाली आहे, का असा आर्त टाहो मोर्चातील उपस्थित महिलांनी उपस्थित केला आहे.

Body:विविध सामाजिक संस्थान निघालेला हा मोर्चा अशोक वाटिका येथून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. याठिकाणी ज्या महिलांवर अत्याचार झाला त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मोर्चेकरांसमोर जाऊन निवेदन स्वीकारून महिलांनी काढलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चाला त्यांनी ही एकप्रकारे समर्थन दर्शविले.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेद्वारे सक्षम प्रतिबंधक उपाययोजना उभारण्यात याव्यात, तक्रार नोंदण्यासाठी क्षेत्राची सीमा नसावी, झिरो एफआयआर प्रणाली देशभरातील पोलिस यंत्रणेने राबवावी, आरोपींना अटक व तपासामध्ये विलंब होणार नाही, अशी व्यवस्था असावी, अत्याचाराची सर्व प्रकरणे जलदगतीने चालवावी, निकालासाठी सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागू नये, अत्याचार प्रकरणातील आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असू नये यसह आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.