ETV Bharat / state

अकोलेकरांना सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हीट'चा अनुभव

author img

By

Published : Sep 13, 2020, 3:41 PM IST

Updated : Sep 13, 2020, 4:38 PM IST

अंगातून सतत घाम येणे, तहान लागणे, घाबरणे यासह आदी लक्षणे जाणवत असल्याचे दिसून येत आहे. काहींना व्हायरल फिवरसह आदी रोग जडत आहे. त्यामुळे, अनेक जण खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.

हवामान
हवामान

अकोला- गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (११ सप्टेंबर) जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, त्यानंतर परत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू राहिला. मात्र, वातावरणाच्या या लहरीपणामुळे अकोलेकरांना उष्णतेची झळ बसत आहे. अकोल्याचा पारा ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला असल्याने नागरिकांना सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हीट'चा अनुभव येत आहे.

माहिती देताना अकोला हवामान विभाग प्रमुख जालिंधर साबळे

ऑगस्ट महिन्याच्या मध्यात आठ ते दहा दिवस पावसाची हजेरी होती. त्यानंतर पावसाने दडी मारली. ती थेट शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारपर्यंत. शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अकोल्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २ सप्टेंबरपासून तापमान ३३.४ अंशावरून थेट दुसऱ्या दिवशी ३५.२ अंशावर पोहोचले. ९ सप्टेंबरला तापमान ३५.८ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे पारा खाली येत थेट ३३.६ अंशावरून तो काल ३४.१ अंशावर आला होता. मात्र, यात उन्हाची दाहकता कमी झालेली नाही. त्यामुळेच अकोलेकरांना सप्टेंबरमध्ये 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे.

ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

अंगातून सतत घाम येणे, तहान लागणे, घाबरणे यासह आदी लक्षणे जाणवत असल्याचे दिसून येत आहे. काहींना व्हायरल फिवरसह आदी रोग जडत आहे. त्यामुळे, अनेक जण खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होत आहे. मात्र, या वातवरणाचा पिकांना फायदा होत आहे. उन्हामुळे पिकांना थोडाफार आधार मिळाला आहे. किडीचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

Last Updated : Sep 13, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.