अकोला - नियंत्रण सुटल्याने भरधाव टँकरने दुचाकीवरील २ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर, एक जण जखमी झाला आहे. सचिन विठ्ठल पवार, असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.
बार्शी-टाकळी तालुक्यातील कातखेड येथील सचिन हा दुचाकीने (एम.एच. ३०, यू ७८१३) बोरगाव मंजूकडे जात होता. दरम्यान, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास टँकर चालकाने (एन.एल.०१ एन-११०१) सचिनच्या दुचाकीस ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तीचे नाव अजून समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.