ETV Bharat / state

पाण्याची टाकी नाही, तरीही घेतला जातो पाणी कर

अकोला तालुक्यातील म्हैसपूर या गावात ५ वर्षाआधी जलस्वराज्य योजनेतून पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू झाले होते. ही टाकी बांधताना फक्त ४ पिलर उभे करण्यात आले. मात्र, त्यावर टाकी बांधण्यात आली नाही. त्यामुळे त्यात पाणी जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणी कर वसूल करत आहे.

mhaispur water tax problem
अर्धवट बांधकाम झालेली टाकी
author img

By

Published : Mar 3, 2020, 7:39 PM IST

Updated : Mar 3, 2020, 8:37 PM IST

अकोला - म्हैसपूर या गावत जलस्वराज्य योजनेतून टाकीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र, संपूर्ण टाकी न बांधता फक्त टाकीचा पायाच बांधण्यात आला. टाकी पूर्णत: बांधली नसतानाही ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणी कर वसूल करत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

अकोला तालुक्यातील म्हैसपूर या गावात ५ वर्षाआधी जलस्वराज्य योजनेतून पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू झाले होते. ही टाकी बांधताना फक्त ४ पिलर उभे करण्यात आले. मात्र, त्यावर टाकी बांधण्यात आली नाही. त्यामुळे त्यात पाणी जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असतानाही अर्धवट बांधकाम झालेल्या टाकीपासूनच ग्रामपंचायतीने गावात लोखंडी पाईपलाईन टाकली आणि नागरिकांच्या घरापर्यंत नळ पोहोचविले. मात्र, पाणी ग्रामस्थांच्या घरात पोहोचले नाही. तरीही ग्रामपंचायत गेल्या ५ वर्षांपासून ग्रामस्थांकडून पाणी कर वसूल करत आहे.

या प्रकारामुळे पाण्याची टाकी बांधण्यात भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड होत आहे. त्यात ग्रामपंचायतीकडून होत असलेली पाणी कर वसूली साफ भ्रष्टाचारच असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडूनही कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे, म्हैसपूर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- अनुसूचित जाती जमातीच्या ३१० कुटुंबांचा मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला; घरकुलाची मागणी

Last Updated : Mar 3, 2020, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.