ETV Bharat / state

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात 'नो मास्क, नो डिस्टन्सिंग' - akola rto office news

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाच नियम पाळण्यात आला नाही. आरटीओ कार्यालय अधिकृत जागेत हलवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

ncp
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात 'नो मास्क नो डिस्टन्सिंग'
author img

By

Published : Sep 29, 2020, 6:07 PM IST

अकोला - एकीकडे जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा, आरोग्य विभाग मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाच नियम पाळण्यात आला नाही. आरटीओ कार्यालय अधिकृत जागेत हलवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात 'नो मास्क नो डिस्टन्सिंग'

राज्य सरकार वेळोवेळी मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगत असून सामान्य जनतेवर कारवाई करत आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेतेही हे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, अकोल्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असेच दिसत आहे. राज्य परिवहन विभाग हे अनधिकृत जागेत असून, ते अधिकृत जागेत हलवण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आरटीओ कार्यालयात आंदोलन केले. हे आंदोलन करताना आंदोलकांनीच मास्क वापरले नाही. तसेच कुठलेही सोशल डिस्टन्सिंग ठेवले नाही. राज्याच्या सत्तेत असलेल्या पक्षाकडूनच नियमांचा भंग केला जात असेल तर सामान्य जनतेने 200 रुपयांचा दंड का भरावा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षक यांनी त्यांना सूचना केल्यानंतर काही जणांनी मास्क लावले. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाला होता.

आरटीओ कार्यालय हे या जागेत स्थलांतरित होण्याआधी त्याची सर्व पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. तसेच मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिल्यावरच हे कार्यालय या जागेत खूप वर्षाआधी स्थलांतरित झाले आहे. कुठेही आरटीओ कार्यालय हलवण्याचा अधिकार हा स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांना नसतो, हे जर आंदोलकांना माहिती असूनही हे आंदोलन होत असेल तर, हे आंदोलन नेमके कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.