ETV Bharat / state

अकोल्यातील नवनिर्वाचित आमदारांची शेतात धाव; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

शेतमालाचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले.

अकोल्यातील नवनिर्वाचित आमदारांची शेतात धाव
author img

By

Published : Oct 29, 2019, 7:41 PM IST

अकोला - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अकोला जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांनी नुकसानग्रस्त भागात धाव घेतली. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

अकोल्यातील नवनिर्वाचित आमदारांची शेतात धाव

पावसामुळे शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. कापाशीची बोंडे ओली होऊन काळी पडली आहेत. शेतमालाचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले.

हेही वाचा - 'पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला'

नवनिर्वाचित आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतीचा तत्काळ सर्वे करून त्याचे पंचनामे तयार करण्याचे आदेश आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ देण्याच्या सूचनाही दिल्या.

संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागाच्या गाव पातळीवरील अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानंतर मंडळ, तालुका व जिल्हास्तरीय अहवालही लगेच सादर करावे, असेही पापळकर यांनी सांगितले.

Intro:अकोला - विधानसभा निवडणूक चा निकाल निकाल लागल्यानंतर आमदार झालेल्या उमेदवारांनी नुकसानग्रस्त भागात भागात धाव घेतली. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीतील पिक नासले. त्यामुळे शेतकरी दिवाळीत आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.Body:गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक फस्त केले आहे. परिणाम शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक निघून गेलेल्या उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटली आहे. पावसामुळे कापसाचे बोंड ओले झाले असून काळपट पडले आहे. अनेक ठिकाणी. अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी. अनेक ठिकाणी कापूस खाली गळाला आहे. परिणाम कापसाला गळती लागली आहे आहे. अशा परिस्थितीत शेतकरी जगत आहे.
दुसरीकडे पाच दिवस आधी विधानसभेचे निकाल लागलेले विधानसभेचे निकाल लागलेले आहेत. या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांनी आपापल्या विधानसभा मतदार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतीचा तत्काळ सर्वे करून त्याचे पंचनामे तयार करण्याचे आदेश आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देण्याचाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. आमदारांच्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना धीर मिळाला आहे.

संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निदेश
अवकाळी पावसामुळे शेतामध्ये असणाऱ्या उभ्या पिकांचे नुकसानीचा महसूल व कृषी विभागाच्या गावपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानंतर मंडळ,तालुका व जिल्हास्तरीय अहवालही लगेचच सादर करावे, असेही निर्देश दिले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.