ETV Bharat / state

Nana Patole On BJP : अजित पवारांना बारामती बंदी हे भाजपाचं पाप, नाना पटोलेंचा घणाघात; म्हणाले... भाजपा विरोधात लढणाऱ्याचं काँग्रेसमध्ये स्वागत - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Nana Patole On BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. हा विषय गंभीर आहे. भाजपानं पेरलेलं हे बीज आहे. त्यांच्यासोबत जो कोणी जाईल, त्यांना 'हे' सहनच करावं लागणार आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 7:47 PM IST

अकोला Nana Patole On BJP : भाजपाच्या विरोधात 28 विरोधी पक्ष आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचं पक्षात स्वागत आहे. काॅंग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात म्हटलंय. अकोल्यात नाना पटोलेंनी स्वराज्य भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपावर बोलताना टीकास्त्र सोडलंय. इतर पक्षांच्या नेत्यांचा समावेश भाजपामध्ये केल्याबद्दल पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय. अजित पवारांना बारामतीमध्ये मराठा समाजानं प्रवेश बंदी केली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. भाजपासोबत 'जो' जाईल त्यांना हे सहन करावं लागेल असं ते म्हणाले.

आरक्षण देण्यास सरकार अपयशी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपानं सत्ता मिळवली. मराठा समाजासह अनेकांना आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात त्याचं पालन करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं पटोले म्हणाले. केंद्र सरकार, तसंच राज्यात सत्ता असताना आरक्षणाच्या मुद्द्याला हात न लावता सरकारनं देशाची लूट केली. देश विकून सत्ता चालवली जात असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज : वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आंबेडकरांनी आघाडीत सहभागी व्हावं, असं सांगून पटोले यांनी काँग्रेस आंबेडकरांशी आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं आश्वासन दिलंय. पुढे बोलताना ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी झाली आहे. पक्षानं अकोला लोकसभा मतदारसंघासाठीही आपला उमेदवार निश्चित केला आहे. अकोल्यातून पक्षाचा उमेदवार निश्चितच विजयी होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

सरकारचा पीक विमा कपन्यांना पाठिंबा : सत्ताधाऱ्यांना राज्यातील बेरोजगार तरुणांच्या भवितव्याची चिंता नसल्याचं त्यांनी सांगितलं. “सरकार फक्त पीक विमा कंपन्यांना पाठिंबा देत आहे, शेतकर्‍यांना नाही,” असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील शाळांमध्ये एक लाख शिक्षकांची कमतरता असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  2. Mangesh Sable On Gunaratna Sadavarte :..अन्यथा ॲड. गुणरत्न सदावर्तेंना गंभीर परिणाम भोगावले लागतील; मंगेश साबळेंचा इशारा
  3. Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या नावावर बच्चू कडूंनी लाटली लाखोंची रक्कम; भाजपाचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.