ETV Bharat / state

सावकारीबाबतच्या कारवाईतील नावे उघड; कोट्यवधींच्या व्यवहाराची चौकशी सुरू - akola news

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हुंडी चिट्ठी आणि सावकारीबाबत केलेल्या कारवाईमध्ये संतोष राठी व राजेश राठी या दोघांची नावे उघड केली. या दोघांकडून कोट्यवधींच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे.

akola
अकोला
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:27 AM IST

अकोला - जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हुंडी चिट्ठी आणि सावकारीबाबत केलेल्या कारवाईमध्ये संतोष राठी व राजेश राठी या दोघांची नावे उघड केली. या दोघांकडून कोट्यवधींच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. आणखी व्यवसायिकांची नावे यात वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाचाही संबंध या कारवाईशी जोडला जात असल्याची माहिती मिळत आहे.

सावकारीबाबतच्या कारवाईतील नावे उघड

हेही वाचा - 'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध

शहरातील दोन व्यापारी तसेच हुंडी चिठ्ठी दलाल यांच्या अवैध सावकारीच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या तीन पथकाने संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनशामदास राठी यांच्याकडे तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या दोन ठिकाणांवरून ४५० पेक्षा अधिक धनादेश जप्त करण्यात आला आहे.

या पथकाने छापेमारी करत संतोष राठी यांच्या राजस्थान भवन येथील कार्यालयातून व राजराजेश्वर हाऊसिंग सोसायटीवरून २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख व ८९ धनादेश जप्त करण्यात आले. तर, राजेश घनशामदास राठी यांच्या रामनगर येथील घरातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख ३४१ धनादेश आणि काही खरेदीखतही जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही राठींकडे धनादेश, चिठ्ठ्या, संगणक आढळले आहे. ही झाडाझडती महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात एस. डब्ल्यू. खाडे, एम. एस. गवई, एस. पी. पोहरे यांच्या पथकाने केली. यात दस्तावेज जप्त करण्यात आले असून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:अकोला - जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हुंडी चिट्ठी आणि सावकारीच्या बाबत केलेल्या कारवाईमध्ये संतोष राठी व राजेश राठी या दोघांची नावे आज उघड केली. या दोघांकडून कोट्यावधींच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. आणखीन व्यवसायिकांची नावे यात वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाचाही सम्बध या कारवाईशी जोडल्या जात असल्याचे समजते. Body:शहरातील दोन व्यापारी तसेच हुंडीचिठ्ठी दलाल यांच्या अवैध सावकारीच्या तक्रारी सहकार विभागाकडे झाल्यानंतर त्यांच्या तीन पथकाने संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनशामदास राठी यांच्याकडे तसेच निवासस्थानी छापेमारी करुन तब्बल ३४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या दोन ठिकाणावरुन ४५० पेक्षा अधीक धनादेश जप्त करण्यात आले आहेत.
सहकार विभागाकडे संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनशामदास राठी या दोघांच्या अवैध सावकारी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. यावरुन तीन पथकाने छापेमारी करीत संतोष राठी यांच्या राजस्थान भवन येथील कार्यालयातून व राजराजेश्वर हाउसींग सोसायटीवरुन २४ लाख ९४ हजार ६९७ रुपये रोख ८९ धनादेश जप्त करण्यात आले. तर राजेश घनशामदास राठी यांच्या रामनगर येथील घरातून ८ लाख ३४ हजार ५०५ रुपये रोख ३४१ धनादेश आणि काही खरेदखतही जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही राठींकडून धनादेश, चिठ्ठया, संगणक आढळले आहे. ही झाडाझडती महाराष्ट्र सावकारी अधिनीयम २०१४ च्या कलम १६ अन्वये करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात एस. डब्ल्यू. खाडे, एम. एस. गवई, एस. पी. पोहरे यांच्या पथकाने केली. या छापेमारीत दस्तावेज जप्त करण्यात आले असून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात आता काय कारवाई करतात याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.

बाईट - डॉ. प्रवीण लोखंडे
जिल्हा उपनिबंधक, अकोलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.