ETV Bharat / state

मनपाच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर, विरोधी पक्ष नेता, शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने - mnc akola

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माजी महापौर विजय अग्रवाल, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा आणि विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण हे आमने-सामने आले आणि त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

akola
मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:08 PM IST

अकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कर विरोधात दिलेल्या निर्णयावर चर्चा सुरू होती. यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा आणि विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण हे आमने-सामने आले आणि या तिघांच्या वादामध्ये प्रशासनाची गोची झाली. दरम्यान, हा विषय महापौर अर्चना मसने यांनी मंजूर केला असल्याचे जाहीर करत यावरील चर्चेला पूर्ण विराम दिला.

महापालिका सर्वसाधारण सभा

घरकर वाढ ही बेकायदेशीर असून ही करवाढ कोणत्या नियमाने केली यासंदर्भात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रश्न विचारला आहे. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जीशान हुसेन हे सभागृहात बोलत असताना त्यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या करवाढीसंदर्भातील पुराव्यांमध्ये माझी व माझ्या पत्नीची वैयक्तिक करभरणा संदर्भातली माहिती महापालिकेने सादर केल्याचा उल्लेख केला. यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी हा प्रकार निंदनीय असून याबाबत सभागृहाने महापौरांच्या करभरणा संदर्भातली माहिती का सादर केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. यावर माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतला, आणि त्या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

हेही वाचा - विकास नाही तर मतदान नाही; खेर्डा ग्रामस्थांनी घेतला निर्णय

अमृत योजनेच्या संदर्भातही शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित केला. हा ठराव पास करताना नियमांची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नंतर त्यांनी माजी महापौर अग्रवाल यांच्या संदर्भात किंबहुना 'मी करून घेईन' 'मी करून घेईन' 'मी करून घेईन' असा उल्लेख सभागृहात केला. यावेळी अग्रवाल यांनी हा शब्द पकडून सदर विषय थांबविण्याची मागणी महापौर मसने यांच्याकडे केली. या सर्व प्रकाराबाबत सभागृहात गदारोळ सुरू असताना महापौर मसने यांनी या विषयावरील सर्व बाबी मंजूर करत पुढील विषय घेण्याचे सांगितले मात्र, विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली.

हेही वाचा - तुकाराम गाथेचे लेखनिक श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक

Intro:अकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टॅक्स विरोधातील दिलेल्या निर्णयावर चर्चा सुरू असताना माजी महापौर विजय अग्रवाल, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा आणि विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण हे आमने-सामने आले. या तिघांच्या वादामध्ये प्रशासनाची गोची झाली. दरम्यान, या गडबडीत हा विषय महापौर अर्चना मसने यांनी मंजूर केला असल्याचे जाहीर करीत या विषयावरील चर्चेला पूर्णविराम दिला.Body:घरकर वाढ ही बेकायदेशीर असल्याचे आणि आणि केलेली वकवाड ही कोणत्या नियमाने केली यासंदर्भात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रश्न विचारला आहे याबाबत काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जीशान हुसेन हे सभागृहात बोलत असताना त्यांनी महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या करवाडी संदर्भातील पुराव्यांमध्ये माझी व माझ्या पत्नीची वैयक्तिक कर भरणा संदर्भातली माहिती महापालिकेने सादर केल्याचा उल्लेख त्यांनी केला यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी हा प्रकार निंदनीय असून याबाबत सभागृहाने महापौरांच्या करभरणा संदर्भातली माहिती का सादर केले नाही असा प्रश्न उपस्थित केला असता माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतला यावरून त्या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली त्यानंतर अमृत योजनेच्या संदर्भातही शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित करीत हा ठराव पास करताना नियमांची ची दखल घेतल्या गेले नसल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी माजी महापौर अग्रवाल यांच्या संदर्भात किंबहुना मी करून घेईन मी करून घेईन मी करून घेईन असा सभाग्रहात उल्लेख करताच विजय अग्रवाल यांनी हा शब्द पकडून हा विषय थांबविण्याची मागणी महापौर अर्चना मसने यांच्याकडे केली या सर्व प्रकाराबाबत सभागृहात गदारोळ सुरू असताना महापौर अर्चना मसने यांनी या विषयावरील सर्व बाबी मंजूर करीत पुढील विषय घेण्याचे सांगतात विरोधकांनी मात्र चर्चा करण्याची मागणी केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.