अकोला - पैशाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर आई व मुलींमध्ये झटपट झाली. त्यात आई खाली पडल्याने जखमी होवून बेशुद्ध झाली. त्यानंतर तिचा मृत्यु झाला आहे. ही घटना स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मृतक महिलेचे नाव सरूबाई कांडलकर आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद-
रिंगरोडवरील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये सरूबाई कांडलकर यांच्यासोबत तिची मुलगी कविता बायस्कर ही राहते. या दोघींमध्ये पैशांच्या कारणावरून दुपारी वाद झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा सायंकाळी याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात झटपट झाली. यामध्ये सरूबाई कांडलकर या खाली पडून त्या बेशुद्ध झाल्यात. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्त पडलेले होते. ही माहिती खदान पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांना मिळताच त्यांनी धाव घेतली. पंचनामा करून परिस्थिती जन्य पुराव्यानुसार त्यांनी याप्रकरणी मुलगी कविता बायस्कर यांच्या तक्रारी वरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
शवविच्छेदन अहवालावरून पुढील कारवाई-
या प्रकरणात संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्यातरी यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असली तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर यामध्ये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. खुनाचा आमचा संशय भक्कम आहे. परंतु, त्याला ठोस पुरावा मिळण्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत, अशी माहिती खदान पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांनी दिली.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरण: सचिन वझे यांना एनआयए'ने केली अटक