अकोला - भारतीय जनता पक्षाने राजकारण करावे. हे कार्य आहे त्यांचे ध्येय आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रात राजकारण आणणे हे अनुचित आहे. शिक्षण क्षेत्राच पावित्र्य संपुष्टात आणले आहे. सरस्वतीच्या मंदिरात कुठेही स्थान असू नये, म्हणून माजी त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा व शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखून इतर राजकीय पक्षांसमोर आदर्श निर्माण करावा, असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक आमदार नागो गाणार यांनी आज व्यक्त केले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार राजकुमार बोनकीले यांच्या प्रचारासाठी अकोल्यात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, या निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्यात आली असल्याबाबतीत विचारणा केली असता ते म्हणाले की जे उमेदवार मतदारांना पैसे, पाकीट, साडीचोळी, जेवण देतात असे उमेदवार लायकीचे नाहीत, असेही त्यांनी परखड मत व्यक्त केले. अशाना शिक्षक मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. तसेच शिक्षण क्षेत्रात सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला आहे. या दोन्ही पक्षांनी या शिक्षण मतदार निवडणुकीत धुडगूस घालू नये, आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी त्यांना माझी विनंती आहे, असेही ते म्हणाले. त्यासोबतच जे उमेदवार शिक्षक नाही, ज्यानी शिक्षक असल्याचे भासवून उमेदवारी मिळविली आहे, अंशावर कायद्याने बंधने आणल्यापेक्षा त्यांना मतदारांनीच मतदान करू नये, असे मत अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीत 11 व 12 वि शिकलेल्या उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक आमदार नागो गाणार यांनी निशाणा साधला. यानंतर राजकुमार बोनकिले यांनी आपले विचार व्यक्त करून शिक्षकांसाठी काम करण्याचे आश्वासन दिले.