ETV Bharat / state

'सिल्वर ओक' हल्ल्यामागील मास्टरमाईंडचा शोध घेणे आवश्यक - आमदार अमोल मिटकरी - mla amol mitkari allegation on bjp

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या घटनेमागे असलेल्या गुणवंत सदावर्ते आणि भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत या घटनेमागील मास्टरमाईंड शोधणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज दिली आहे.

mla amol mitkari
आमदार अमोल मिटकरी
author img

By

Published : Apr 9, 2022, 8:39 PM IST

Updated : Apr 9, 2022, 9:03 PM IST

अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या घटनेमागे असलेल्या गुणवंत सदावर्ते आणि भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत या घटनेमागील मास्टरमाईंड शोधणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज दिली आहे. भविष्यात महाराष्ट्रामध्ये दंगली घडविण्याचा आरोप भाजपवर त्यांनी लावला आहे.

आमदार अमोल मिटकरी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने ज्या वेगवेगळ्या पध्दतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला होता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न गुणरत्न सदावर्तेकडून झाला. कालही जल्लोष साजरा होत असताना चिथावणीखोर भाषण सदावर्तेने दिले. त्यामध्ये 12 तारखेला शरद पवार यांना बारामतीत मी येऊ देणार नाही, अशा पद्धतीची चिथावणी देणारी वक्तव्य केली. या सगळ्या गोष्टींमुळे कायदा आणि सुव्यवसंस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस कमी होते हे अचानक गेले कसे? त्या सगळ्याचा पाठपुरावा होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचा खरा मास्टरमाईंड नागपूरमध्ये बसलेला आहे. आता इतक्या दिवसांपासून भाजपचे आमदारांनी आंदोलन चाललं होतं. त्यामध्ये सदाभाऊ खोत होते, आणखी काही नेते भाजपचे होते. त्या लोकांनी हे आंदोलन चिघळवण्याचा वारंवार प्रयत्न केला. आता इकडून तिकडून उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा 23 तारखेला रुजू होण्याचे आदेश असताना सुद्धा अशा प्रकारे चिथावणी देऊन महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारे भाजपने व्यक्तव्य केले. त्यामुळे भाजपचा तर मी तीव्र निषेध करतो, असे मिटकरी म्हणाले.

केंद्रातील हिटलरशाही महाराष्ट्र मातीत घालेल - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माझी विनंती आहे, आता यामागचे खरे मास्टर माइंड शोधा. नागपूरमध्ये बसलेला असेल किंवा नसेल त्याला शोधलं पाहिजे. कारण उद्या चपला आणि दगड दिली, मी सांगतो राम नवमीच्या उत्सवाचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रमध्ये दंगल घडकऊ शकते. त्याचे हे सूचक आहे. त्यामुळे वेळेवर जागे झालं पाहिजे. भाजपची लोक ज्या पद्धतीन तोंडसुख घेत आहेत, अनिल बोंडे नावाचे माजी कृषिमंत्री महाराष्ट्राचा फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला देत आहे, त्या अनिल बोंडेंना मी सांगू इच्छितो की, हिटलर शेवटच्या क्षणी कसा मेला हे सगळ्यांना माहीत आहे. तुमच्या पक्षात हिटलर कोण आहेत, माहित आहे. महाराष्ट्रातील हिटलरशाही आणि केंद्रातील हिटलरशाही महाराष्ट्र मातीत घालणार आहे. तुमचा अहंकार महाराष्ट्राने मातीत घातला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी गोष्ट नाही. त्यामुळे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Last Updated : Apr 9, 2022, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.