ETV Bharat / state

Minister Bacchu Kadu Akola :...तर पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल - मंत्री बच्चू कडू - रस्ते विकास घोटाळा प्रकरण

येथे आमच्या एका पैशाचाही संबंध हेत नाही. विकासाची प्रचंड या ग्रामस्थांची मागणी होती. म्हणून हा रस्ता आपण मंजूर केला. 3 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय वाचवा. मिसिंग जोडणे, नवीन रस्त्याचे 20 टक्के काम करण्याची कामे त्यामध्ये घेता येते. यांच्यामध्ये कुठलीही अनियमीतता, भ्रष्टाचार झाला नाही. चिंधीचा साप करण्याचा प्रकार यामधून झाला आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे, असेही पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

मंत्री बच्चू कडू
मंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Feb 27, 2022, 8:11 PM IST

Updated : Feb 27, 2022, 8:18 PM IST

अकोला - माझ्यावर रस्त्याच्या कामात अफरातफर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवधन पुंडकर यांनी केले आहेत. हे आरोप चुकीचे आहेत. मी जर या कामांमध्ये एक पैसाही खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल, असे व्यक्तव्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. शिवाय पुंडकर तुम्ही करु शकता हे सिद्ध तरी करुन दाखवा, आव्हानही बच्चू कडू यांनी केले आहे. कुटासा गावात बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री बच्चू कडू

'पुंडकरांना वेगळ्या चष्माची गरज'

कुटासा पिंपळोद हा पूल पाहण्यासाठी ते कुटासा गावात आले होते. याच पुलाबाबत आक्षेप वंचितचे पुंडकर यांनी आक्षेप घेतला होता. यावेळी पालकमंत्री कडू यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत कामाची माहिती घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी हा रस्ता किती महत्वाचा आहे, हे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्याला ग्रामीण रस्ता क्रमांक 120 हा दिला आहे. तो जिल्हा परिषदेने दिला आहे. पुंडकर यांना वेगळ्या चष्माची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ऑन दि स्पॉट येथे आलो आहे. हा रस्ता चार पाच गावाला रस्ता जातो. हा कधी गावात फिरलाच नाही. त्यांच्यामुळे हा कहर निर्माण झाला आह, अशी टीकाही कडू यांनी केली आहे.

'चिंधीचा साप करण्याचा प्रकार'

चार हजार एकर जमीन या रस्त्याला लागून आहे. या रस्त्याची गरज आहे. या रस्त्यामुळे अनेक जनावरे यांचे अपघात झाले आहे. ट्रॅक्टर, ट्रक खराब होत आहे. या रस्त्याची मागणी होती, म्हणून हा रस्ता मंजूर केला आहे. येथे आमच्या एका पैशाचाही संबंध हेत नाही. विकासाची प्रचंड या ग्रामस्थांची मागणी होती. म्हणून हा रस्ता आपण मंजूर केला. 3 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय वाचवा. मिसिंग जोडणे, नवीन रस्त्याचे 20 टक्के काम करण्याची कामे त्यामध्ये घेता येते. यांच्यामध्ये कुठलीही अनियमीतता, भ्रष्टाचार झाला नाही. चिंधीचा साप करण्याचा प्रकार यामधून झाला आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे, असेही पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

'अशा अधिकाऱ्यांना फासावर लटकावले पाहिजे'

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टेपिंग प्रकरणात पुणेच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनेक आमदार आणि नेत्यांचे फोन टेपिंग करण्यात आल्याचे आरोप लावण्यात आले आहे. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सुद्धा फोन टेपिंग करण्यात आला असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे देशात खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल तर देशाला भविष्यात मोठ्या संकटालासमोरे जावे लागणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तर अशा अधिकाऱ्यांना फासावर लटकावले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Radhakrishna Vikhe Patil on Maratha Reservation : ठाकरे सरकार मराठा समाजाची उपेक्षा करतंय; आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

Last Updated : Feb 27, 2022, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.