ETV Bharat / state

समाजातील दुःख पाहुन गाडगेबाबांनी अभंग रचले - पालकमंत्री कडू

author img

By

Published : Mar 13, 2021, 4:48 PM IST

गाडगेबाबांनी निवाऱ्याला प्रथम स्थान दिले आहे. त्याच्याही पुढे जर आपण पाहिले तर गाडगेबाबांनी दहासुत्री कार्यक्रम आखला. त्यामध्ये निवारा, वस्त्र, अन्न यांच्यासह आदींचा समावेश आहे. गाडगेबाबांनी समाजातील दुःख पाहून आपले अभंग रचले आहेत. गाडगेबाबांचे विचार नसते तर आज बच्चू कडू याठिकाणी नसते, असेही मंत्री बच्चू कडू म्हणाले.

अकोला
अकोला

अकोला - समाजातील दुःख पाहून गाडगेबाबांनी अभंग तयार केले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज केले. गाडगेबाबांच्या विचारांमुळेच बच्चू कडू हा इथपर्यंत येऊन पोहोचला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अकोला

अकोट फाइल परिसरात असलेल्या बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त मीना अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, नगरसेवक राजेश मिश्रा, मनिष हिवराळे यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्वच गोष्टी पैशाने होत नाहीत. पैसा असला की माणसे घरात राहत नाहीत, पैसा पाहिजे असे नाही. अनेकांकडे पैसा भरपूर आहे तर काहींकडे तो काहीच नाही. देशामध्ये तफावत पण आहे, तफावत ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

गाडगेबाबांचे विचार नसते तर...

गाडगेबाबांनी निवाऱ्याला प्रथम स्थान दिले आहे. त्याच्याही पुढे जर आपण पाहिले तर गाडगेबाबांनी दहासुत्री कार्यक्रम आखला. त्यामध्ये निवारा, वस्त्र, अन्न यांच्यासह आदींचा समावेश आहे. गाडगेबाबांनी समाजातील दुःख पाहून आपले अभंग रचले आहेत. गाडगेबाबांचे विचार नसते तर आज बच्चू कडू याठिकाणी नसते, असेही ते म्हणाले. गाडगेबाबांच्या विचारांना धरूनच समाजामध्ये प्रगती होऊ शकते, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. म्हणून गाडगेबाबांचा विचार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मंत्री कडू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष हिवराळे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.