ETV Bharat / state

पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू, शिलोडा गावातील घटना

शिलोडा गावाजवळ असलेल्या तलावात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली. सय्यद तौसीफ सय्यद अनिस असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

author img

By

Published : Jul 21, 2020, 4:20 PM IST

पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

अकोला : शिलोडा गावाजवळ असलेल्या तलावात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) घडली. सय्यद तौसीफ सय्यद अनिस (वय 29) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सलाम नगरात राहणारे सय्यद तौसीफ हे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर त्याला वर येता न आल्याने तो बुडाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. काही वेळाने त्याचा मृतदेह सापडला. त्यांना उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासन शिलोडा गावाजवळील माती वापरत आहे. त्यामुळे तिथे मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्याने हे तलाव सारखे झाले आहेत. या ठिकाणी पोहण्यासाठी बरेच युवक येत आहे. याप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.