अकोला - येथील मूर्तिजापूरमधील एमआयडीसीत असलेल्या लक्ष्मी ऑईल मिलला आज सकाळी आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.
शहरालगत असलेल्या मूर्तिजापूर येथील औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑइल मिलला भीषण आग लागली. या आगीत सोयाबीनचे पोते, यंत्रासह लाखोंची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय आहे. कंपनीला आग लागल्याची माहिती मूर्तिजापूर पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मूर्तिजापूर अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आग विझविली. या आगीत आॅईल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. तसेच यंत्रसामुग्रीचेही मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.