ETV Bharat / state

पोलिसांवरील चाकू हल्लाप्रकरणी एकास शिक्षा, दोघांची निर्दोष सुटका; एटीएसच्या विशेष न्यायालयाचा निकाल - अकोला

यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथे 25 सप्टेंबर 2015 रोजी बकरी ईदच्या दिवशी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याने पोलिसांवर चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींपैकी एकास शिक्षा आणि दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

अकोला
author img

By

Published : May 21, 2019, 7:22 PM IST

अकोला - यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथे 25 सप्टेंबर 2015 रोजी बकरी ईदच्या दिवशी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याने पोलिसांवर चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींपैकी एकास शिक्षा आणि दोघांची निर्दोष मुक्तता एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने आज केली. शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव अब्दुल मलिक अब्दुल रजाक असे आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथे 25 सप्टेंबर 2015 रोजी बकरी ईदच्या दिवशी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याने पोलिसांवर चाकू हल्ला केला होता. पोलिसांनी त्याला अटक करीत शोएब अहमद खान आणि शेख सलिम मलिक उर्फ हाफिज मुजीबुर रहमान यांनाही अटक केली. या तिघांवर प्राणघातक हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, शासकीय कर्मचाऱ्यास इजा पोहोचविण्याचे उद्देशाने मारणे, अवैधरित्या शस्त्र वापरणे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल केले होते. हे प्रकरण अकोला एटीएस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.

अकोला

एटीएसने तपास पूर्ण करीत प्रकरण एटीएसच्या विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट केले. विशेष न्यायालयाने यामध्ये 60 साक्षीदार तपासले. यामध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात अब्दुल मलिक अब्दुल रजाक याच्यावर आरोप सिद्ध झाले. तर इतर दोन आरोपी शोएब अहमद खान आणि शेख सलिम मलिक उर्फ हाफिज मुजीबुर रहमान यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाही.

त्यामुळे विशेष न्यायालयाने या दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. अब्दुल मलिक यास शासकीय कामात अडथळा आणणे यामध्ये 3 वर्षे, शासकीय कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून परावृत्त करणे आणि दुखापत पोहोचविणे यामध्ये 3 वर्षे, मारहाण करणे यामध्ये 2 वर्षे अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडही ठोठावला आहे. आरोपीतर्फे अॅड. अली रजा खान, अॅड. नजीब शेख, अॅड. दिलदार खान, अॅड. अब्दुल शफीक यांनी काम पाहिले. तर एटीएसतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.

Intro:अकोला - पुसद येथील घटनेतील तीन आरोपीपैकी एकास शिक्षा आणि दोघांची निर्दोष मुक्तता एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने आज केली. ही घटना 25 सप्टेंबर 2015 रोजी बकरी ईदच्या दिवशी घडली होती. शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव अब्दुल मलिक अब्दुल रजाक असे आहे.

Body: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे 25 सप्टेंबर 2015 रोजी बकरी ईदच्या दिवशी अब्दुल मलिक अब्दुल रजाक याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी त्याला अटक करीत शोएब अहमद खान आणि शेख सलिम मलिक उर्फ हाफिज मुजीबुर रहमान यांनाही अटक केली. या तिघांवर प्राणघातक हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहान करणे, शासकीय कर्मचाऱ्यास इजा पोहोचविण्याचे उद्देशाने मारणे, अवैधरित्या शस्त्र वापरणे तसेच आतंकवादी गतीविधीनुसार गुन्हा दाखल केले होते. हे प्रकरण अकोला एटीएस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. एटीएसने तपास पूर्ण करीत प्रकरण एटीएसच्या विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट केले. विशेष न्यायालयाने यामध्ये 60 साक्षीदार तपासले. यामध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात अब्दुल मलिक अब्दुल रजाक याच्यावर आरोप सिद्ध झाले. तर इतर दोन आरोपी शोएब अहमद खान आणि शेख सलिम मलिक उर्फ हाफिज मुजीबुर रहमान यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाने या दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. अब्दुल मलिक यास शासकीय कामात अडथळा आणणे यामध्ये 3 वर्ष, शासकीय कर्मचारी यास कर्तव्यापासून परावृत्त करणे आणि दुखापत पोहोचविणे यामध्ये 3 वर्षे, मारहाण करणे यामध्ये 2 वर्ष अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडही ठोठावला आहे. आरोपीतर्फे अड. अली रजा खान, अड. नजीब शेख, अड. दिलदार खान, अड. अब्दुल शफीक यांनी काम पाहिले. तर एटीएसतर्फे विशेष सरकारी वकील अड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.