अकोला - अकोल्यात ७० वर्षाच्या जिवंत व्यक्तीला मतदार यादीत मृत दाखवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. ही व्यक्ती मतदानासाठी आली असता त्यांना यादीत मृत दाखवल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
याच मतदार केंद्रात वासूदेव दामोदर ठाकरे, त्यांची पत्नी व मुलगा यांचे सुध्दा नाव मतदारयादीत नाही. याच बरोबर श्रीकृष्ण सदोजी बडे यांचे ही नाव मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. या बाबत बीएलओनी आक्षेप घेतला असता त्यांना झोनल ऑफीसशी बोलल्या नंतरच मतदान करता येईल, असे मतदान केंद्रातील अधिकांऱ्यानी स्पष्ट केले.