ETV Bharat / state

कालीचरण महाराजांच्या अटकेनंतर त्यांच्या वडिलांनी दिली 'ही' प्रतिक्रिया - कालीचरण महाराज वडील धनंजय सराग

मला याबद्दल काही माहीत नाही. तो धर्मासाठी काम करत आहे, चांगले काम कर, हेच माझे सांगणे आहे. तो दहावी पर्यंत शिकलेला आहे. तो हरिद्वार येथे गेला होता, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांचे वडील धनंजय सराग ( Kalicharan Maharaj father Dhananjay Sarag ) यांनी दिली.

Kalicharan Maharaj father Dhananjay Sarag
कालीचरण महाराज यांचे वडील धनंजय सराग
author img

By

Published : Dec 30, 2021, 4:55 PM IST

Updated : Dec 30, 2021, 8:05 PM IST

अकोला - मला याबद्दल काही माहीत नाही. तो धर्मासाठी काम करत आहे, चांगले काम कर, हेच माझे सांगणे आहे. तो दहावी पर्यंत शिकलेला आहे. तो हरिद्वार येथे गेला होता, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांचे वडील धनंजय सराग ( Kalicharan Maharaj father Dhananjay Sarag ) यांनी दिली.

माहिती देताना कालीचरण महाराज यांचे वडील धनंजय सराग

हेह वाचा - Akola Shiv Sena Agitation : शिवसैनिकांनी जाळला कर्नाटक सरकारचा पुतळा; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

महाराजांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप

कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj arrest ) यांना अटक झाल्यानंतर अकोल्यात त्यांच्या निवासस्थानी शांतता आहे. घरातील त्यांचे नातेवाईक काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र, घराजवळ जुने शहर पोलिसांची गस्त आहे. त्यांचे अनुयायी बोलण्यास काही तयार नाही. मात्र, नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी महाराजांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांकही चुप्पी साधत आहेत.

आपण महाराज नव्हे तर..

कालीचरण महाराज अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसे काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मुळ नाव अभिजीत धनंजय सराग असे आहे. शिवाजीनगर भागातील धनंजय आणि सुमित्रा सराग हे त्यांचे आई वडील. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना महाराज संबोधने सुरू केले. मात्र, कालीचरण महाराज स्वत: आपण महाराज नव्हे तर, 'कालीमाते'चा भक्त आणि पुत्र असल्याचे सांगतात.

'या' बॉलिवूड अभिनेत्याने महाराजांची केली होती स्तुती

कालीचरण महाराज जरीचे लाल कपडेच वापरतात. जरीची काठाची लुंगी, लाल रंगाचे 'टी शर्ट', त्यावर जरीचा लाल रंगाचा पंचा, कपाळभर गर्द लाल रंगाच्या कुंकवाचा कोरीव गोल टिळा, 'ट्रिम' केलेली दाढी, व्यवस्थित रुद्राक्षाच्या माळा लावलेल्या जटा अन गळ्यातही रुद्राक्षांची आकर्षक माळ. लॉकडाऊन सुरू होण्याआधी कालीचरण महाराज मध्यप्रदेशात होते. या दौऱ्यात मध्यप्रदेश बजरंग सेनेचे अध्यक्ष अमरीश रॉय त्यांना रायसेन जिल्ह्यातील भोजपूर गावातील सोमनाथ शिवमंदिरात घेऊन गेले होते. भोजपुरातील ओबेदुल्लागंजमधील हे शिवमंदिर फार प्राचीन आहे. या मंदिरात गातानाचा त्यांचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. आणि पुढे सोशल मीडियावर तो व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला. कालीचरण महाराजांच्या शिवतांडव स्तोत्रचा व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करीत कालीचरण महाराजांची स्तुती केली होती.

'या' निवडणुकीत पराभव झाला होता

कालीचरण महाराजांनी 2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावले होते. प्रभाग क्रमांक दहा 'ड' मधून ते उभे होते. मात्र, कालीचरण महाराज यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. 2015 मध्ये त्यांच्यावर अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 324 अन्वये गुन्हा दाखल होता. या प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, कालीचरण महाराज यांचा अनुयायी वर्ग वाढत आहेत. श्रावण महिन्यातील शेवटच्या कावड यात्रेमध्ये कालीचरण महाराज प्रत्येक कावड पालखीचे जयहिंद चौक येथे स्वागत करतात. मोठी आरती करतात. यावेळी मोठ्या प्रमाणात हळद उधळल्या जाते.

हेह वाचा - अकोला मनपाचे 139 ठराव निलंबित; सेना भाजपची एकमेकांवर राजकीय कुरघोडी

Last Updated : Dec 30, 2021, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.