ETV Bharat / state

दहशतवाद विरोधी पथकाची विविध ठिकाणी तपासणी; श्वान पथकाचाही घेतली मदत

author img

By

Published : Nov 9, 2020, 7:35 AM IST

दहशतवाद विरोधी पथक महिन्यात प्रत्येक महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी तपासणी करीत असते. या पथकाकडून संभावीत बॉम्ब सापडण्याची ठिकाणे ठरविलेले असतात. याचाच एक भाग म्हणून बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठ या परिसरात पथकाने बॉम्ब शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या उपकरणाच्या माध्यमातून तपासणी केली. श्वान पथकाने ही बसस्थानक येथे प्रवाशांची बॅग, बसमध्ये पाहणी केली. अशाच प्रकारे रेल्वे स्थानक व बाजारपेठ येथे तपासणी करण्यात आली.

anti-terrorist squad
दहशतवादी विरोधी पथक

अकोला - दहशतवाद विरोधी पथकाने शहरातील महत्वाच्या ठिकाणी शनिवारी बॉम्ब शोध मोहीम राबविली. या पथकात श्वान पथक सहभागी झाले होते. बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली.

दहशतवाद विरोधी पथक महिन्यात प्रत्येक महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी तपासणी करीत असते. या पथकाकडून बॉम्ब सापडण्याची संभावीत ठिकाणे ठरलेली असतात. याचाच एक भाग म्हणून बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठ या परिसरात पथकाने बॉम्ब शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या उपकरणाच्या माध्यमातून तपासणी केली. श्वान पथकाने ही बसस्थानक येथे प्रवाशांची बॅग, बसमध्ये पाहणी केली. अशाच प्रकारे रेल्वे स्थानक व बाजारपेठ येथे तपासणी करण्यात आली.

दरम्यान, या प्रयोगामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. बसस्थानकावर बॉम्ब सापडल्याची चर्चा पसरली होती. नागरिकांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. बसस्थानकाजवळ गर्दी झाली होती. ज्यावेळी त्यांना सत्य परिस्थिती लक्षात आली, त्यावेळी ते आल्या पावली परत गेले. तपासणी नंतर परिस्थिती शांत झाली. पथक प्रमुख विलास पाटील हे यावेळी उपस्थित होते.

पथकाकडून प्रत्येक महिन्यात नेहमीच होते तपासणी -
दहशतवाद विरोधी पथक महिन्यात प्रत्येक महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी तपासणी करीत असते. त्यामध्ये बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासह महत्वाच्या ठिकाणांसोबतच राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गावरील जुने आणि महत्वाचे पूल, महत्वाची शासकीय व ऐतिहासिक स्थळांची तपासणी हे पथक करीत असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.