ETV Bharat / state

अकोल्यात 250 खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांचे आदेश - अकोला कोरोना न्यूज

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तातडीने 250 खाटांचे नवे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

akola
अकोला
author img

By

Published : May 7, 2021, 11:01 PM IST

अकोला - येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 250 खाटांचे नवीन कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज (7 मे) दिले आहेत. याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात यावी, असेही त्यांनी सुचविले आहे. याबाबतचे ट्विट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सध्या 450 खाटांचे कोविड रुग्णालय आहे. यापैकी 60 खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे तातडीने 250 खाटांचे नवे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

माहिती व जनसंपर्क संचलनालयाचे ट्विट
माहिती व जनसंपर्क संचलनालयाचे ट्विट

'कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिक रित्या नेमा'

'अकोला येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे. मात्र, हे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत न थांबता याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजित कोविड रुग्णालयातील 250 खाटांपैकी 50 खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिक रित्या नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे', असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

हेही वाचा - अमली पदार्थ तस्कराला अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा - एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्या - परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्रांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.