ETV Bharat / state

नितीन गडकरींच्या पत्रावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया; म्हणाले, मी नितीन गडकरींचा चाहता आहे, पण.... - अकोला ताज्या बातम्या

नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.

Gadkari wrote letter to Uddhav Thackeray

author img

By

Published : Aug 14, 2021, 7:17 PM IST

Updated : Aug 15, 2021, 6:33 AM IST

अकोला - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'मी गडकरींचा चाहता आहे' -

या पत्राबाबत पालकमंत्री बच्चू कडू बोलताना म्हणाले, मी पण एक त्यांचा चाहता आहे. केंद्रात सगळ्या चांगले काम करणारे आणि प्रभावी नेते आहेत. पण उद्धव ठाकरेही तोलामोलाची आणि तितक्याच ताकदीचे नेते आहेत. उद्धव ठाकरे नक्कीच त्या पत्राबाबत काय खरे आहे, खोट आहे, हे पाहून दोघांचाही उद्देश सारखाच आहे. या सगळ्यात खरी बाजू समोर येईल, असे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

गडकरींनी उद्धव ठाकरेंना लिहीले होते पत्र -

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असंच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील,' असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. 'महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण यात त्वरीत हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंतीही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा - राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करा, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची मागणी

Last Updated : Aug 15, 2021, 6:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.