अकोला- आयटकतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी अशोक वाटीका येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो आयटक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सिटी कोतवाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवावे, थकीत असलेला भत्ता तत्काळ द्यावा, राज्यातील दोन लाख कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरा, आदी मागण्यांसाठी हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी दुर्गा देशनुन, महानंदा ढोक, आशा मदने, सुनंदा पदगणे, ज्योती धस, ज्योति तामोड, माधुरी परनाटे, माला इंगळे, रामदास ठाकरे यांच्यासह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. हे जेलभरो आंदोलन रमेश गायकवाड, एस.एन. सोनोने, सुनिता पाटील, नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले.