अकोला - जिल्ह्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारी जोरदार हजेरी लावली. दुपारी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला तसेच जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गही सुखावला.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. यामुळे पुन्हा पाऊस व्हावा, अशी सर्वांनाच अपेक्षा लागली होती. दरम्यान, सकाळपासून ढगाळ वातावरण होते, त्यामुळे दुपारी पाऊस पडेल अशी अपेक्षा केली जात होती. त्यानंतर दुपारी अचानक जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तरांबळ उडाली. मात्र, या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. जोरदार पाऊस झाला तरीसुद्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात अजूनही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.