ETV Bharat / state

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिव्यांग धीरजने सर केले माउंट एल्ब्रुस

घरची प्रतिकूल परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या अपंगत्वावर मात करीत दिव्यांग धीरजने रशियामधील सर्वोच्च हिमशिखर माउंट एल्ब्रुस सर केले आहे.

माउंट एल्ब्रुस
author img

By

Published : Aug 21, 2019, 2:45 PM IST

अकोला - घरची प्रतिकूल परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या अपंगत्वावर मात करीत दिव्यांग धीरजने रशियामधील सर्वोच्च हिमशिखर माउंट एल्ब्रुस सर केले आहे. 16 ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज फडकवत त्याने आपल्या यशाची पावती दिली. मनगटापासून एक हात व एक पाय नसतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर धीरजने हे हिमशिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा 'धीरज कळसाईत' हा पहिला दिव्यांग असल्याचे मानले जात आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिव्यांग धीरजने सर केले माउंट एल्ब्रुस

धीरजने यापुर्वीच दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलीमंजारो हे हिमशिखर सर केले होते. हे शिखर सर करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला होता. त्याच्या या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डला नोंदसुद्धा करण्यात आली. रशियातील माउंट एल्ब्रुस या हिमशिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर असून अत्यंत प्रतिकूल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर बर्फाच्छादित असून तेथील उणे तापमानाचा सामना करत धीरजने आपल्या धाडसी वृत्ती व इच्छाशक्तीचा परिचय देत हे शिखर सर केले आहे. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा अनेक वेळा हे शिखर सर करणे अशक्यप्राय ठरते. मात्र, धीरजने १५ ऑगस्टला रात्री चढाईला सुरुवात करुन १६ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याने भारतीय राष्ट्रध्वज फडकाविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

हलाखीच्या परिस्थितीतही धीरज परिश्रम करून गिर्यारोहक झाला. आईवडील मोलमजुरी करून त्याचे हट्ट पुरविण्याचा प्रयत्न करतात. त्याचे यश पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याला साथ देतात. त्याच्या शौर्यामुळे त्याने अकोटचेच नाव नव्हे तर अकोल्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा कोरले आहे.

Intro:अकोला - घरची प्रतिकूल परिस्थिती आणि जन्मजात असलेल्या अपंगत्वावर मात करीत दिव्यांग धीरज रशियामधील सर्वोच्च हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवत त्याने आपल्या यशाची पावती दिली. घरची हलाखीची परिस्थिती आणि अपंगत्वाचे शिखरवर मात करणाऱ्या धीरजने मात्र हिमशिखरचीही मान आपल्या कर्तुत्वाने झुकविली आहे. मगटापासून एक हात व एक पाय नसतानासुद्धा जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर धीरजने हे हिमशिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे.
Body:धीरजने यापुर्वीच दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलीमंजारो हे हिमशिखर सर केले होते. हे शिखर सर करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला होता. त्याच्या या विक्रमाची 'इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड' व महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्डला नोंदसुद्धा करण्यात आली. रशियातील माउंट एलब्रुस या हिमशिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर असून अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर संपूर्णत: बर्फाच्छादित आहे. त्या ठिकाणचे तापमान उणे असून कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत धीरजने आपल्या धाडसी वृत्ती व धीरोदत्त इच्छाशक्तीचा परिचय देत हे शिखर सर केले आहे. शारीरीकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा हे शिखर सर करणे अनेक वेळा अशक्यप्राय ठरते. धीरजने १५ आॅगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून त्याने भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
हलाखीच्या परिस्थितीत ही धीरज परिश्रम करून गिर्यारोहक झाला. आईवडील मोलमजुरी करून त्याचे हट्ट पुरविण्याचा प्रयत्न करतात. त्याचे यश पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याला साथ देतात. त्याच्या शौर्यामुळे त्याने अकोटचेच नाव नव्हे तर अकोल्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा कोरले आहे. Conclusion:बाईट - धीरज कळसाइत
बाईट - प्रभावती कळसाईत,आई
बाईट - योगेश वाकोडे, मित्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.