ETV Bharat / state

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्षांची माहिती

ग्रामसेवक संघटनेचे राज्यभरातील आंदोलन सध्या स्थगित झाले असले, तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविबाबू काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

author img

By

Published : Sep 14, 2019, 6:04 PM IST

Updated : Sep 14, 2019, 11:56 PM IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरुच राहणार आहे.

अकोला - ग्रामसेवक संघटनेचे राज्यभरातील आंदोलन सध्या स्थगित झाले असले, तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविबाबू काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 322 ग्रामसेवकांना कार्यमुक्त केल्यामुळे ग्रामसेवकांमध्ये असंतोष आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरुच राहणार आहे.

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासह कंत्राटी ग्रामसेवकांची पदे भरण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी या संघटनेतर्फे करण्यात आली होती. तसेच सध्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्या सोबतच ग्राम विकास अधिकाऱ्या ऐवजी पंचायत विकास अधिकारी, असे या पदाचे नामकरण करावे. या मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते. यामुळे राज्य सरकारने ग्रामसेवकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा ग्रामसेवकांच्या दप्तर कुलूपबंद आंदोलनामुळे शेतीचे पंचनामे रखडले

संबंधित आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 322 ग्रामसेवकांना कार्यमुक्त केले. यानंतर आयुष प्रसाद यांना शासकीय कामात असहकार्य दर्शवण्याचा पवित्रा या संघटनेमार्फत घेण्यात आला होता. तसेच कोणतेही प्रशिक्षण अथवा बैठकीत ग्रामसेवक उपस्थित राहणार नसल्याचेही सांगण्यात आले. सध्या संघटनेतर्फे पुकारण्यात आलेले असहकार आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.

हेही वाचा ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

संबंधित पत्रकार परिषदेला राज्याचे सहसचिव शेख चांद कुरेशी, तालुकाध्यक्ष सुधाकर खंडारे, गणेश निमकर्डे, महेंद्र बोचरे, जनार्धन मुसळे हे उपस्थित होते.

Intro:अकोला - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 322 ग्रामसेवकांना कार्यमुक्त केले होते. या कारवाईमुळे ग्रामसेवकांनी मध्ये रोश निर्माण झाला होता. ग्रामसेवक संघटनेचे राज्यभरातील आंदोलन आज जरी स्थगित झाले असले तरी अकोला जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक संघटनेने मात्र असहकार आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविबाबू काटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. Body:जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, कंत्राटी ग्रामसेवकांची पदे भरण्यात येऊ नये, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रुजू केलेले आहेत त्यांना कायम करणे या सोबतच सोबतच ग्राम विकास अधिकारी ऐवजी पंचायत विकास अधिकारी असे पदनाम करावे यासह आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे नागरिकांच्या कामांचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने ्रामसेवकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले होते. या आदेशाच्या नुसार अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 322 ग्रामसेवकांना कार्यमुक्त केले होते. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये रोष निर्माण झाला होता. परिणामी राज्याचे ग्रामसेवकांचे आंदोलन स्थगित झाले असले तरी जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन हे सुरूच तरी जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन हे सुरूच आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचा सूतोवाच त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना कुठल्याही दप्तर दाखविण्यात येणार नाही.
तसेच कुठलेही प्रशिक्षण, कुठल्याही बैठकीत ग्रामसेवक उपस्थित राहणार नाही. त्यासोबतच निवडणुकीचे कामे, आपत्कालीन कामे यासोबतच नागरिकांचे कामेही ग्रामसेवक करणार आहेत. परंतु, ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धारही संघटनेने केला असल्याचे जिल्हाध्यक्ष रविबाबू काटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राज्याचे सहसचिव शेख चांद कुरेशी, तालुकाध्यक्ष सुधाकर खंडारे, गणेश निमकर्डे, महेंद्र बोचरे, जनार्धन मुसळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

बाईट - रविबाबू काटे
जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना
Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.