ETV Bharat / state

'आता हेच आमचे घर' असे म्हणत घरकुल लाभार्थ्यांचे प्रहारसोबत अकोला मनपात आंदोलन - prahar protest Akola Mnc

आज घरकुलसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले. मनपात घरकुलचा पैसा जमा असतानाही लाभार्थ्यांना घरकुल का देण्यात येत नाही? असा प्रश्न प्रहारच्या वतीने करण्यात आला.

prahar protest Akola Mnc
घरकुल लाभार्थी आंदोलन अकोला
author img

By

Published : Jun 21, 2021, 4:24 PM IST

अकोला - आज घरकुलसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले. मनपात घरकुलचा पैसा जमा असतानाही लाभार्थ्यांना घरकुल का देण्यात येत नाही? असा प्रश्न प्रहारच्या वतीने करण्यात आला. 'आता हेच आमचे घर' असे म्हणत प्रहारने महापालिकेत घरगुती आणि जेवणाचे साहित्य घेवून आंदोलन सुरू केले. मनपा आयुक्त यांच्या कक्षासमोर हे ठिया आंदोलन करण्यात येत आहे.

माहिती देताना प्रहारचे नेते मनोज पाटील

मनपा अधिकारी तसदी घेत नसल्याचा आरोप

अकोला महापालिकेच्या हद्दीतील गरिबांना पंतप्रधान आवास योजना व इतर आवास योजनांचा लाभ मिळाला आहे. परंतु, मनपामधील अधिकारी हा लाभ मिळवून देण्यासाठी कुठलीही तसदी घेत नाही. त्यामुळे, शहरातील लाभार्थी हा अजूनही घरकुलपासून वंचित आहे. पाच हजारांपेक्षा जास्त प्रकरणे अद्यापही मंजूर होवून त्यांना लाभ मिळाला नाही.

हेही वाचा - 'वंचित'ने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला रास्तारोको; इंधन दरवाढ मागे घेण्याची केली मागणी

पालकमंत्री बच्चू कडू यांनी आठ दिवसाआधी मनपातील घरकुल योजनेचा आढावा घेतला होता. यामध्ये लाभार्थी वंचित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये गावठाण आणि गुंठेवारीची प्रकरणे प्रलंबित आहे. घरकुलचे 25 कोटी रुपये मनपात येवून पडलेले आहे. परंतु, त्याचा लाभ अजूनही लाभार्थ्यांना भेटलेला नाही. लाभार्थी दररोज मनपात येवून घरकुलसाठी मागणी करीत आहे. परंतु, मनपातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.

आंदोलना आणले घरातील साहित्य

या सर्व बाबींकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना शेकडो लाभार्थी सहभागी झाले. तसेच, घरातील सर्व साहित्य घेऊन ते मनपात आंदोलन करीत आहेत. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी घरातील गॅस शेगडी, स्वयंपाक करण्यासाठी असलेले साहित्य आणले आहे. तसेच, आंदोलकांनी स्वयंपाक बनवून जेवणही केले आहे.

हेही वाचा - विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू; पाथर्डी येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.