अकोला - दिवसभरात आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार 42 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. 141 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. प्राप्त ३४ पॉझिटिव्ह अहवालात १९ पुरुष व १५ महिला आहेत. तसेच काल व आज मिळून ३९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. हे कोरोनाग्रस्त रुग्ण वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.
गायत्रीनगर येथील 7, कौलखेड येथील 4 रामदास पेठ येथील 2, मोठी उमरी येथील 2, सोनटक्के प्लॉट येथील 2, रजतपुरा येथील 2,अकोट फैल येथील 2, जुने शहर येथील 2 तर न्यू तारफैल, हिंगणा रोड, बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट, मोमीनपुरा, काला चबुतरा, खदान, सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल-२७६
पॉझिटीव्ह-४२
निगेटीव्ह-२३४
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५५८
मृत-२९(२८+१)
डिस्चार्ज-३८८
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४१