अकोला - सीएए, एनआरसी, कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान सिटी कोतवाली, बाळापूर, पातूर पोलीस स्टेशनंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या तिन्ही पोलिस ठाण्यांतर्गत एकूण ३३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यांतर्गत ११ आरोपींविरोधात भादंवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, ३३२, ३३६, ३३७, ४२७, राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम ८ ब, सहकलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, १५३ सार्वजनिक मालमत्तेची हानी पोहचविण्यास प्रतिबंध कायदा १९८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
बाळापूर येथे सात आरोपींविरोधात भादंवी कलम १४३, ३४१, १८८, महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १३५, तर सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला १५ आरोपीविरोधात भादंवी कलम ४५२, १४३, १४७, १४९, ३४१, ३४२, १८८, १०९ सहकलम १३४, १३५, १४० क्रिमीनल लॉ अमेनमेन्ट अॅक्ट १९३५ अन्वये कलम ७ नुसार गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इतर आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे.