अकोला - जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मशीन सील करण्याचे काम शुक्रवारी पार पडले.
जिल्हा परिषद निवडणूक 7 जानेवारीला होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार जोरात सुरू झाला आहे. त्यानुसार प्रशासनही आवश्यक ती निवडणुकीची संपूर्ण कामे पूर्ण करत आहे. त्यामध्ये ईव्हीएम मशीन सील करणे, त्यांची क्रमवारी लावणे, मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासारखी कामे निवडणूक विभागाकडून करण्यात आली.
हेही वाचा - दारूची अवैध वाहतूक करणारे ४ जण पोलिसांच्या ताब्यात, ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला तालुक्यात 194 मतदान केंद्र असून 194 ईव्हीएम मशीन सिलिंग करण्यात येत आहेत. तर 20 ईव्हीएम मशीन राखीव राहणार आहेत. तर जिल्ह्यात 1 हजार 19 मतदान केंद्र आहेत. तर राजकीय पक्षांकडून प्रचारतोफा धडधडाडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सुरू केला आहे. तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (शनिवारी) प्रचारासाठी अकोल्यात येत आहेत.