ETV Bharat / state

threw dead female infant on street : जन्मदात्या बापानेच रस्त्यावर फेकले मृत स्त्री जातीचे अर्भक; सर्वोपचार रुग्णालयासमोरील घटना

author img

By

Published : Nov 5, 2022, 5:08 PM IST

जन्मतःच प्रकृती गंभीर असलेल्या तीन दिवसाच्या चिमुकलीचा शुक्रवारी (Akola) सर्वोपचार रुग्णालयातील एनआयसीयुमध्ये (Incident in front of Sarvopachar Hospital) मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी मृत स्त्री जातीचे बाळ अंत्यसंस्कारासाठी पित्याच्या ताब्यात दिले. परंतु, क्रुर बापाने त्या मृत बाळावर अंत्यसंस्कार न करता ते रस्त्यावर (father who threw dead female infant on street) फेकून दिले.

threw dead female infant on street
रस्त्यावर फेकले मृत स्त्री जातीचे अर्भक

अकोला : जन्मतःच प्रकृती गंभीर असलेल्या तीन दिवसाच्या चिमुकलीचा शुक्रवारी (Akola) सर्वोपचार रुग्णालयातील एनआयसीयुमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी मृत स्त्री जातीचे बाळ अंत्यसंस्कारासाठी पित्याच्या ताब्यात दिले. परंतु, क्रुर बापाने त्या मृत बाळावर अंत्यसंस्कार न करता ते रस्त्यावर (father who threw dead female infant on street) फेकून दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात (Incident in front of Sarvopachar Hospital) हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करीत बेजबाबदार बापाला अटक केली असून; पोलिसांनी त्या मृत चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले.

The birth father threw the dead female infant on the street

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवर भिंतीजवळ अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांच्या मदतीने अर्भकाला सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक वैद्यकीय तपासात हे स्त्री जातीचे अर्भक असून ते मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तपासादरम्यान हे अर्भक सर्वोपचार रुग्णालयातीलच होते. तिच्यावर उपचार केल्यानंतर तिला मृत घोषित केल्याचे समोर आले.

एनआयसीयुमध्ये शुक्रवारी उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुलीचे वडील ज्ञानेश्वर डोरळे यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र, अंत्यसंस्कार न करताच जन्मतात्या पित्याने तिला रस्त्यावर फेकून दिले. तपासादरम्यान तासाभरातच पोलिसांनी ज्ञानेश्वर डोरळे याला सर्वोपचार रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. मुलीचा बाप ज्ञानेश्वर डोरळे याला पोलिसांनी अटक केली असून; पोलिसांच्या मदतीने मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत अरभकाला जन्मतःच नव्हती अन्ननलिका : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलारा येथील रहिवासी मुक्ता ज्ञानेश्वर डोरळे यांची एक नोव्हेंबर रोजी सर्वोच्च रुग्णालयात प्रसूती झाली. मुलगी जन्माला आली पण, तिला जन्मतःच अन्ननलीका नसल्याने सर्वोपचार रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू होता. उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीचा मृतदेह मुलीचा पिता ज्ञानेश्वर डोरळे यांच्याकडे सोपविला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.