अकोला - कीटकनाशक फवारणीतून 128 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने ते व्हेंटीलेटर वर असून, तीन अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
विषबाधित 33 शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक 26 शेतकरी अकोल्यातील असून, इतर सात शेतकरी बुलढाणा, वाशीम जिल्ह्यातील आहेत.
हेही वाचा औरंगाबाद- आखात वाडा तांडा येथे फवारणी करताना विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू
खरीप पिकांच्या पेरणीनंतर त्यांवर फवारणी करण्याचे काम जोरात सुरू आहे. यातूनच काही दिवसांपासून शेतकऱ्यांना विषबाधा होत असल्याच्या घटना समोर आल्या. पिकांवर कीटकशकाची फवारणी करताना दक्षता न घेणाऱ्या 33 शेतकऱ्यांवर गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा नाशकात अंजन वडेलच्या निवासी वसतिगृहातील 114 विद्यार्थ्यांना विषबाधा
सध्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यापैकी 76 शेतकऱ्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून, उर्वरित शेतकरी अद्याप अॅडमिट आहेत.
शनिवारी (ता. 24) रोजी फवारणीतून विषबाधा झाल्याने अंदुरा येथील गजानन जाणूजी इंगळे (वय 48) यांचा मृत्यू झाला होता.