ETV Bharat / state

घरातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची शेतीला भेट - कृषी विषयक बातम्या

एकीकडे शेतकरी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर येथील काही शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे पेरुन भरघोस उत्पन्न घेत आहेत.

सोयाबीन पिकाची पाहणी करताना
सोयाबीन पिकाची पाहणी करताना
author img

By

Published : Jul 5, 2020, 4:32 PM IST

Updated : Jul 30, 2020, 5:50 PM IST

अकोला - एकीकडे शेतकरी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर येथील काही शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे पेरुन भरघोस उत्पन्न घेण्याचा चंगच बांधला आहे. या परिसरामध्ये असलेल्या शेतांमध्ये हिरवळ होती. या भागातून जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ जात असताना या शेताची त्यांनी पाहणी केली. तसेच येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

घरातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान,

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान खात्याने दर्शविला होता. परंतु, जून महिन्यात सुरू झालेल्या पावसाने आपला रंग दाखविलाच. पहिला पाऊस 11 जून त्यानंतर 16 जून रोजी पडलेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यानंतर पाऊस न पडल्याने त्यांना दुबार पेरणीचे संकट आले. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या. एकीकडे शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारी आणि त्यांचे पंचनामे करण्याचे शासनाकडून आलेले आदेश हे काम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील अलादतपूर या गावात असलेल्या शेत शिवारामध्ये शिवारामध्ये सोयाबीन हे डौलाने उभे होते.

वीतभर उगवलेल्या सोयाबीनने पूर्ण शेतामध्ये हिरवळीची चादरच दिसत होती. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी घरातीलच सोयाबीन बियाणे वापरुन बैलजोडीच्या माध्यमातून पेरणी केली केली. त्यामुळे या परिसरात सोयाबीन चांगले उगवले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त या गावातून जात असताना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ हे जातीने तिथे थांबले. सोयाबीन, तूर या पिकाची पाहणी केली असता त्यांनी समाधान व्यक्त केले. कुतूहलाने त्यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. पेरणी कशी केली या संदर्भात संदर्भात त्यांनी चर्चा केली. तसेच या सोयाबीन वर कीड येऊ नये आणि त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा - अकोल्यात 38 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू

Last Updated : Jul 30, 2020, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.