अकोला - सलग बारा महिने काम मिळण्यासाठी शेतमजुरांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यालयाबाहेर सहा दिवस निदर्शने केली. यावेळी कुलसचिवांनी शेतमजुरांची समजूत काढत यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात असलेल्या विविध भागांमध्ये बेरोजगार आणि शेतमजुरांना काम दिले जाते. परंतु, हे काम देताना या मजुरांवर आता चालढकल करण्यासारखा प्रकार करण्यात येत आहे. या मजुरांना नियमित काम मिळत नसल्याची परिस्थिती आहे. शेतमजुरांना साप्ताहिक ६ दिवस सलग १२ महिने काम उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी कृषी विद्यापीठातील विभाग प्रमुख यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमजुरांना विभाग प्रमुख नियमित काम देत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.