ETV Bharat / state

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व शिवसेना जिल्हा प्रमुखांचा वाद ठाण्यात - Shiv Sena district chief

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या (सेस फंड) नियोजनासंदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना माहिती मागण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना माहिती देण्यास टाळाटाळ करणे अभियंत्यांना चांगलेच भोवले. साडेसहा कोटी रुपयांच्या नियोजनाची माहिती न दिल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखांनी अभियंत्यांच्या टेबलवरील काचेवर जोरात हात मारल्यामुळे काच फुटली. त्यानंतर हा वाद कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र, नंतर सामोपचाराने प्रकरण मिटवण्यात आले.

अकोला1
author img

By

Published : Mar 12, 2019, 8:26 AM IST

अकोला - जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या (सेस फंड) नियोजनासंदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना माहिती मागण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना माहिती देण्यास टाळाटाळ करणे अभियंत्यांना चांगलेच भोवले. साडेसहा कोटी रुपयांच्या नियोजनाची माहिती न दिल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखांनी अभियंत्यांच्या टेबलवरील काचेवर जोरात हात मारल्यामुळे काच फुटली. त्यानंतर हा वाद कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र, नंतर सामोपचाराने प्रकरण मिटवण्यात आले.

जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत १२ मिनिटात बांधकाम विभागाच्या साडे सहा कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे या विषयी समितीच्या कारभाराचे व साडेसहा कोटी रुपयांच्या नियोजनाचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वाभाडे काढण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते रमण जैन व इतरांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. दरम्यान, याच साडेसहा कोटी रुपयांच्या नियोजनाची माहिती मागण्यासाठी सोमवारी सांयकाळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात गेले होते. यावेळी कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी कोणत्याही प्रकारची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कार्यकारी अभियंता सोनवणे व शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांच्यात चांगलाच वाद झाला. यावेळी नितीन देशमुख यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवरील काचावर जोरात हात मारला. त्यामुळे काच फुटली.

या प्रकारानंतर कार्यकारी अभियंत्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सेसच्या नियोजनचा वाद कोतवाली पोलीस ठाण्यात पोहचला. परंतु, नंतर समोपचाराने प्रकरण मिटवण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी शहराची पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी कोतवाली पोलीस ठाणे गराडा घातल्याने शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने यांनी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलास पाचारण केले होते.

Intro:अकाेला - जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या (सेस फंड) नियाेजनासंदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना माहिती मागण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना माहिती देण्यास टाळाटाळ करणे अभियंत्यांना चांगलेच भाेवले. साडे सहा काेटी रुपयांच्या नियाेजनची माहिती न दिल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखांनी अभियंत्यांच्या टेबलवरिल काचावर जाेरात हात मारल्यामुळे काच फुटला. त्यानंतर हा वाद काेतवाही पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहचला. परंतु नंतर समाेपचाराने प्रकरण मिटवण्यात आले.Body:जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत १२ मिनीटात बांधकाम विभागाच्या साडे सहा काेटी रुपयांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यामुळे या विषयी समितीच्या कारभाराचे व साडे सहा काेटी रुपयांच्या नियाेजनाचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वाभाडे काढण्यात आले हाेते. त्यानंतर या प्रकरणी भाजपचे विराेधी पक्षनेते रमण जैन व इतरांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार सुद्धा केली हाेती. दरम्यान याच साडे सहा काेटी रुपयांच्या नियाेजनाची माहिती मागण्यासाठी साेमवारी (ता. ११) संध्याकाळी ५.३० वाजतानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात गेले असता त्यांना कार्यकारी अभियंता संजय साेनवणे यांनी काेणत्याही प्रकारची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कार्यकारी अभियंता साेनवणे व शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांच्यात चांगलाच वाद झाला. यावेळी नितीन देशमुख यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवरिल काचावर जाेरात हात मारला. त्यामुळे टेबलवरिल काच फुटला. या प्रकारानंतर कार्यकारी अभियंत्यांनी काेतवाही पाेलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सेसच्या नियाेजनचा वाद काेतवाली पाेलिस ठाण्यात पाेहचला. परंतु नंतर समाेपचाराने प्रकरण मिटवण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी शहराची पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी कोतवाली पोलीस ठाणे गराडा घातल्याने शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने यांनी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलास पाचारण केले होते.Conclusion:सूचना - व्हिडीओ सोबत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.