ETV Bharat / state

Super Specialty Hospital Akola : सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापनेचे श्रेय घेण्याचा डॉ. रणजीत पाटील यांचा प्रयत्न - काँग्रेसचा आरोप - super specialty hospital in Akola

अकोला शहरात स्थापन झालेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ( Super Specialty Hospital Akola ) स्थापनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील ( Dr. Ranjit Patil ) करीत आहेत. या रुग्णालयासाठी १५० कोटी रुपये मंजूर करून आणल्याचा दावाही डॉ. पाटील करीत आहेत. परंतु, अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या स्थापनेमागे ( construction of super specialty hospital in Akola ) आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा कोणताही संबंध नाही नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Super Specialty Hospital Akola
Super Specialty Hospital Akola
author img

By

Published : Dec 10, 2022, 9:17 PM IST

अकोला - अकोला शहरात स्थापन झालेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ( Super Specialty Hospital Akola ) स्थापनेचे संपूर्ण श्रेय डॉ. सुधीर ढोणे यांनाच असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत गावंडे यांनी केला आहे. स्थानिक शासकिय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या स्थापनेसाठी ( construction of super specialty hospital in Akola ) तत्कालीन केंद्र सरकारने १५० कोटी रू. मंजूर केले. त्यावेळी केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्यावेळी रुग्णालयासाठी पदनिर्मिती मंजूर झाली.

रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न - त्यावेळीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. डॉ. रणजीत पाटील ( Dr. Ranjit Patil ) हे २०१५ ते २०१९ या काळात राज्यात मंत्री होते. त्यांच्या काळात सुपर स्पेशालिटीसाठी निधी व पदनिर्मितीबाबत कोणतेही काम झालेले नाही. असे असतांनाही सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न डॉ. रणजीत पाटील करीत असून आपली निष्क्रीयता लपविण्यासाठी काँग्रेस सरकारने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हॉस्पीटलच्या स्थापनेचे श्रेय डॉ. सुधीर ढोणे यांनाच - सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या स्थापनेचे श्रेय डॉ. सुधीर ढोणे यांनाच आपल्या दाव्याच्या पृष्ठ्यर्थं प्रशांत गावंडे यांनी यावेळी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाशी संबंधीत सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून पत्रकारांना दाखविले. डॉ. सुधीर ढोणे यांनी १५ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी डॉ. सुधीर ढोणे यांच्या पत्रावर शेरा नमुद करून सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल स्थापनेबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश संचालक वैद्यकीय शिक्षण यांना दिले होते. त्यानंतर राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केंद्र सरकारकडे अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

रणजीत पाटीलांनी पद निर्मितीसाठी काय केले? - महाविकास आघाडी मंत्रीपदाच्या काळात डॉ. रणजीत पाटीलांनी पद निर्मितीसाठी काय केले? राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. डॉ. रणजीत पाटील हे अकोल्याचे पालकमंत्री, ९ विविध खात्यांचे राज्यमंत्री होते. परंतु या पाच वर्षाच्या काळात त्यांनी अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक असलेली वर्ग-१ ते वर्ग-४ ही पदे निर्माण केली नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अकोल्यासह राज्यातील यवतमाळ, लातूर, औरंगाबाद या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी ८८८ पदे मंजूर केली होती. डॉ. रणजीत पाटील यांना सुपर स्पेशालिटीबाबत खरोखर तळमळ असती तर, त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात पदे मंजूर करून घेतली असती, असे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केला आहे.

केंद्रात त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. गुलाम नबी आझाद हे सार्वजनिक आरोग्य मंत्री होते. डॉ. सुधीर कोणे यांनी नवी दिल्लीत आझाद यांची भेट घेवून अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या स्थापनेबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यातही अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती, असे प्रशांत गावंडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, डॉ. सुधीर ढोणे हे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.