ETV Bharat / state

कोरोना विषाणूबाबत जनजागृती; कृषी विद्यापीठासह रासेयो विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम - अकोला

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सर्वच शासकीय तथा खासगी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत जागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन एकत्र आलेले कृषीचे विद्यार्थी आपल्या कृषी विषयक संदेश, कोरोना जनजागृती संदेश, विद्यापीठ तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.

Corona
विद्यार्थ्यांची पोस्टरद्वारे जनजागृती
author img

By

Published : Apr 27, 2020, 12:58 PM IST

अकोला - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सर्वच शासकीय तथा खासगी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वगृही रवाना करण्यात आले. ऑनलाईन एकत्र आलेले कृषीचे विद्यार्थी आपल्या कृषी विषयक संदेश, कोरोना जनजागृती संदेश, विद्यापीठ तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात सहाय्यभूत ठरत आहेत.

'आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचे कोणी जात नाही'

विदर्भातील 11 जिल्हे व त्यातील 34 कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 2600 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यापीठाचा लौकिक वाढवत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या नेतृत्वात संचालक शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनात सर्व विषयांचे विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी ऑनलाइन पद्धतीने पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम राबवत आहेत. अकोल्यातील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावी आपल्या घरी राहूनच इंस्टाग्रामवर एकत्रितरित्या प्रसारित केलेला अतिशय भावपूर्ण असा 'आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचे कोणी जात नाही' हा अंगावर शहारे उभा करणारा व्हिडिओ तयार केला.

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतच्या सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रसारित पोस्टर्स केले. या पोस्टर्समधून घरीच थांबण्याचे आवाहन करत सामाजिक आंतर जोपासण्याचे सल्ले प्रेरणादायी आहेत. लॉकडाऊनच्या या बिकट परिस्थितीत सुद्धा येणारा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाने आपले प्रयत्न पणाला लावले आहेत. शेतकरी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने या उपक्रमांचा लाभ घेत खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.