अकोला - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट करणाऱ्या वंदना भोसले या महिलेविरूद्ध सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात आज वंचितचे कार्यकर्ते जीवन डिगे यांनी तक्रार दाखल केली आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
पुणे येथील वंदना भोसले नामक महिलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अनुसूचित जाती-जमाती आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट केली आहे. जीवन डिगे यांनी वंदना भोसले यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण करणे, सामाजिक अशांतता निर्माण करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचारास प्रतिबंध (सुधारीत) कायदा २०१५ नुसार गुन्हे दाखल करुन, तिला तत्काळ अटक करावी, यासाठी सिव्हिल लाइन्स पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्यासह शहराध्यक्ष शंकरराव इंगळे, सम्राट सुरवाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.