ETV Bharat / state

मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलस्वार तरुणाची देशभ्रमंती - mother tongue

डोंबिवलीच्या एका तरुण मातृभाषेच्या संवर्धनासाठी चक्क सायकलवर देशभ्रमंतीसाठी निघाला आहे. काल रविवारी हा तरुण अकोला येथे पोहोचला.

सायकलस्वार तरुणाचे अकोल्यात स्वागत करण्यात आले.
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:57 AM IST

अकोला - एका ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलवरून देशभ्रमंती सुरू केली आहे. गंधार कुळकर्णी (रा. डोंबिवली) असे या युवकाचे नाव आहे. मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच या तरुणाने केलेला हा आगळावेगळा प्रयत्न त्याचे मातृभाषेवरील प्रेम दर्शवून देतो.

या तरुणाने 1 जुलै 2018 ला डोंबिवली येथून सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये प्रवास करत सायकलीवर १९ हजार २०० किमी इतके अंतर पार केले आहे. आता त्याने परत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

रविवारी हा युवक भ्रमंती करत अकोल्यात पोहोचला. येथे पोहोचल्यानंतर शहरवासियांनी त्याचे जोरदार स्वागत केले. येथे त्याने डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व इतर शिक्षण संस्थांना भेट दिली. यानंतर हा तरुण पुढच्या प्रवासाला रवाना झाला.

Intro:अकोला - मराठी या मातृभाषेच्या संवर्धनाकरिता विविधांगी प्रयत्न सुरू असतानाच, एक ध्येयवेड्या युवकाने मातृभाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलने देशभ्रमंती सुरू केली आहे. गंधार डोंबिवलीकर (कुळकर्णी) असं या युवकाच नाव आहे. Body:गंधार भ्रमंती करत असताना अकोल्यात पोहोचला. येथे मुक्काम राहून गंधार काही शैक्षणिक संस्थांना भेटी देणार आहे. या तरुणाने 1 जुलै 2018 ला डोंबिवली येथून सायकल यात्रेला सुरवात केली आहे. आता पर्यंत तो मध्य प्रदेश , राजस्थान, हरियाणा , हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि आता परत महातराष्ट्रात प्रवेश केला आहे. अकोल्यात पोहोचल्यानंतर  अकोलेकरांनी गंधारचे जोरदार स्वागत केले.अकोल्यावरुन गंधार पुढील प्रवासास निघाला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.