अकोला - कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत संचारबंदी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले होते. तरीही संख्या कमी न झाल्याने अकोला महापालिका क्षेत्र, अकोट आणि मूर्तिजापूर शहरात आठ मार्चपर्यंत संचारबंदी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जीवनावश्यक वस्तूची दुकाने राहणार सुरू
तिन्ही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने लॉकडाउनकाळात बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने जसे औषध, भाजी, किरणा दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार सुरू प्रतिबंधित महानगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रातील उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी, शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे, सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील, लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह 25 व्यक्तींना परवानगी राहील, सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील. मालवाहतूक की नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीन चाकीमध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील.
बसमध्ये ५० टक्के प्रवासी
आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. यासाठी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे नियोजन करतील.
नवीन नियमावतील इतर सूचना
- - प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिकस्थळे १ मार्चपर्यंत बंद राहतील.
- - भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील.
- - मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल.
- - हॉटेल, सिनेमागृह, शाळा-महाविद्यालये बंद
- - प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सकाळी ९ ते सायंकाळी ५पर्यंत व्यवहार
- - कोरोना प्रतिबंधासाठी सुधारित उपाययोजना
- - प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३पर्यंतच सुरू
- - लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी
- - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार
- - जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद