ETV Bharat / state

मूगानंतर आता कापसावर बोंडअळीचे संकट; बळीराजा पुन्हा चिंतातुर - Akola farmers in crisis

अकोट आणि तेल्हारा या परिसरात कपाशीवर बोंडअळीने डोके वर केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून बोंड अळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. अकोट शेत शिवारात पेरलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crisis of bollworm on cotton now after moog; farmers in crisis again
मूगानंतर आता कापसावर बोंडअळीचे संकट; बळीराजा पुन्हा चिंतातुर
author img

By

Published : Aug 6, 2020, 5:55 PM IST

Updated : Sep 3, 2020, 5:35 PM IST

अकोला - मूग पिकावर आलेल्या अज्ञात रोगानंतर आता कापसाच्या पिकावरही बोंड अळीने आक्रमण केले आहे. यामुळे हातातील नगदी पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच कृषी विभागाकडूनही याबाबत दखल न घेतल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

मूगानंतर आता कापसावर बोंडअळीचे संकट; बळीराजा पुन्हा चिंतातुर

अकोट आणि तेल्हारा या परिसरात कपाशीवर बोंडअळीने डोके वर केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून बोंड अळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. अकोट शेत शिवारात पेरलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोट तालुका हा कापसाच्या पिकाकरिता सुपीक भाग मानला जातो.

बिटी कापसाचे उत्पन्न घेण्यातही तालुका अग्रेसर आहे. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यात कापूस लागवड केली आहे. त्या कपाशीला फूलपाती लागली आहे. मात्र, त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे पिकांवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्हा कंत्राटदार अन् इंजिनिअर्स असोसिएशनकडून शासन निर्णयाची होळी

मूग पिकावर आलेल्या अज्ञात रोगाने शेतकरी त्रस्त झालेला असताना कापसावर आलेल्या बोंडअळीनेही शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कापसावर गुलाबी बोंड अळीचा विळखा कायम आहे. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

Last Updated : Sep 3, 2020, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.