ETV Bharat / state

अकोल्यात कैद्यांसाठी तात्पुरते कारागृह उभारणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांमुळे गर्दी होऊन कोरोना संसर्गाची भीती वाढू शकते. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा कारागृहाला रेल्वे स्टेशनजवळील शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त जागा तात्पुरते कारागृह तयार करण्यासाठी देण्यात आली आहे.

temporary jail will be set up for prisoners in Akola
अकोल्यात कैद्यांसाठी तात्पुरते कारागृह उभारणार
author img

By

Published : Apr 29, 2020, 3:31 PM IST

अकोला - जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांमुळे गर्दी होऊन कोरोना संसर्गाची भीती वाढू शकते. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा कारागृहाला रेल्वे स्टेशनजवळील शासकीय विश्रामगृह येथे अतिरिक्त जागा तात्पुरते कारागृह तयार करण्यासाठी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ही जागा कारागृह प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेशही दिले आहेत.

अकोल्यात कैद्यांसाठी तात्पुरते कारागृह उभारणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हेही वाचा... #coronavirus : मालेगावात लष्कराची गरज वाटत नाही : गृहमंत्री

जिल्हा कारागृहात दाखल बंदिवानांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशान्वये जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या कारागृहात विलगीकरण करून ठेवण्यात येईल.

जुन्या शासकीय विश्रामगृहाची इमारत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते कारागृह स्थापन करण्यासाठी कारागृह अधीक्षक यांच्या ताब्यात द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता या इमारतीत करावी. कारागृह अधीक्षकांनी ही इमारत ताब्यात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.