ETV Bharat / state

कोरोना : संचारबंदीतही अकोल्यातील किराणा दुकानात नागरिकांची गर्दी - कोरोना अकोला

संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस आहे. परंतु, आज मात्र अकोल्यात पोलिसांनी शांततेत नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नसले तरी नागरिकांची रस्त्यावर धावपळ सुरूच आहेत.

अकोला
अकोला
author img

By

Published : Mar 25, 2020, 4:31 PM IST

Updated : Mar 25, 2020, 9:30 PM IST

अकोला - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देश सध्या 'लॉक डाउन' आहे. सगळीकडे संचारबंदी आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात करून ठेवण्यासाठी अनेक नागरिक किराणा दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. अकोला येथील किराणा मार्केटमध्ये नागरिक डाळ, तेल व इतर साहित्य घेण्यासाठी दुकानांमध्ये येत आहेत. किराणा दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

अकोला

सगळीकडे संचारबंदी आहे, तरीही नागरिक औषधे आणणे, दवाखान्यात जाणे, भाजीपाला आणणे यासह इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना परत घरी जाण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येत आहे. संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस आहे. परंतु, आज मात्र अकोल्यात पोलिसांनी शांततेत नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नसले तरी नागरिकांची रस्त्यावर धावपळ सुरूच आहेत.

हेही वाचा - कोरोना विरुद्ध लढण्याची गुढी उभारू - अशोक चव्हाण

तसेच किराणा मार्केटमध्ये घरात मुबलक खाद्य साहित्य आणण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मिळेल ते खाद्य साहित्य घेऊन जाणे, असाच सपाटा सध्या नागरिकांनी लावला आहे. दरम्यान, खरेदी करताना कुठलीही धांदल उडून नये, म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासोबतच मोकाट फिरणाऱ्या तरुण-तरुणींची पोलिसांकडून विचारपूस करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या नाका बंदीला न जुमानता अनेक नागरिक किराणा साहित्य भाजीपाला खरेदी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे हा बंद खरंच यशस्वी झाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Last Updated : Mar 25, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.