ETV Bharat / state

अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 137 वर - akola corona news

शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेल्या अहवालापैकी 42 नमुने पॉझिटिव्ह आल्याने अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या 137 वर पोहोचली आहे.

Akola gotvt medical college
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्याल
author img

By

Published : May 9, 2020, 9:37 AM IST

अकोला- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 137 वर पोहोचली आहे.शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे १९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४९ अहवाल निगेटिव्ह तर ४२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान एका ७८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार पर्यंत प्रत्यक्षात १११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.

शुक्रवारपर्यंत एकूण १२८१ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी १२६८ अहवाल आले आहेत. ११३१ अहवाल निगेटिव्ह तर १३७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत व १३ अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

तपासणीसाठी पाठवलेल्या एकूण १२८१ जणांचे नमुन्यापैकी प्राथमिक तपासणीचे १०८४, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.