ETV Bharat / state

अकोल्यात कार व ट्रकची भीषण धडक.. आई-वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू - अपघात बातमी अकोला

मूर्तिजापूर जवळील नागोली नागठणा गावाजवळ एका कंटेनर ट्रक आणि कारचा आज (सोमवार) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे.

Container and car accident in Akola
अकोला कंटेनर आणि कार अपघात
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:54 PM IST

अकोला - मूर्तिजापूर जवळील नागोली नागठणा गावाजवळ एका कंटेनर ट्रक आणि कारचा आज (सोमवार) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी मूर्तिजापूर पोलीस दाखल झाले. जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा सिटी कार (एमएच ०४ बीडब्ल्यू ५२५९) ला अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच १५ एफव्ही १४१३) ने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. कारचा समोरील भाग तर चक्काचूर झाला.

हेही वाचा - दु:खाचा डोंगर..! अवघ्या 9 दिवसात सख्ख्या तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू

नवरा, बायको आणि त्यांची दोन चिमुकले घटनास्थळीच ठार झाले. बुऱ्हान दिलावर (वय ५०), फातिमा गुलामहुसैन (वय ३५), तसनिम (वय ३), बुर्हानोद्दीन (वय ६ महीने) असी मृतांची नावे आहेत. हुसेन गुलाम हुसेन(५०), साबीया हुसेन हबीब(३०)आणि हुसेन हबीब मो.हबीब(३५) हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना येथील जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, पण अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्याला पाठवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.