अकोला - लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मित्राला गांजा देण्यासाठी न्यायालय परिसरात गेलेल्या मित्रावर आरोपी होण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या परिसरात गांज्याची पुडी देणाऱ्या संबंधित मित्राला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसाद दत्तात्रय झाडे असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अनुप गणेश परिहार याला 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने संबंधित आरोपीची कारागृहात रवानगी केली. यादरम्यान न्यायालय परिसरातून आरोपीला बाहेर नेत असताना पोलिसांच्या व्हॅनमध्ये प्रसाद दत्तात्रय झाडे यांनी गांजाची पुडी फेकली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने प्रमोद लांडगे आणि सतीश प्रधान यांना मारहाण केली होती. मारहाणीत दोघे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रसाद झाडे याला अटक केली. त्याच्याविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतल पोलिसांनी प्रसाद झाडे याला न्यायालयात हजर केले. आता न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास अद्याप सुरू आहे.